Friday , October 25 2024
Breaking News

सिक्कीमध्ये हाहा:कार; महाराष्ट्रातील २८ जण संकटात अडकले

Spread the love

 

सिक्कीम येथे ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. या पावसामुळे १५०० ते २००० पर्यटक अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील देखील अनेक पर्यटक अडकले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडकलेल्या पर्यटकांपैकी काही जणांशी फोनवरुन संवाद साधला. या सर्व अडकलेल्या पर्यटकांची विचारपूस करुन त्यांना मुख्यमंत्र्यांनी धीर दिला आहे.

सिक्कीममधील लाचोंग इथं अडकले पर्यटक
दरम्यान, सिक्कीममध्ये अडकलेल्या या पर्यटकांची लवकरात लवकर सुटका व्हावी, यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ताबडतोब अडकलेल्या पर्यटकांपर्यंत मदत पुरवण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. सध्या २८ जणांचा एक ग्रुप सिक्कीम येथील लाचोंग या ठिकाणी अडकला असून, त्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी स्वतः मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोननंतर प्रशासन लागले कामाला
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोननंतर प्रशासन कामाला लागले आहे. अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने मदत पुरवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. सिक्कीमध्ये अडकलेल्या २८ जणांना सीएमओ तसेच सिक्कीम सरकारकडून देखील मदतीसाठी फोन आले आहेत. त्यांना हवी ती मदत तातडीने पुरवली जाणार आहे. अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी दोन हेलिकॉप्टर तयार आहेत. परंतु, ढग आणि ख़राब हवामानामुळे त्यात अडचणी येत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातली टीम रेग्युलर टीमच्या सतत संपर्कात आहे.

About Belgaum Varta

Check Also

गोमंतकीय कवी नवनाथ मुळवी आणि मानसी जामसंडेकर यांना ‘अभिजात मराठी भाषा काव्यगौरव पुरस्कार’

Spread the love  मोरणा कवी कट्टा समूह सांगली, पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने “माय मराठी: अभिजात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *