शिमला : हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काॅंग्रेस नेते वीरभद्र सिंह दिर्घ आराजाने गुरूवारी पहाटे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
शिमलातील इंदिरा गांधी मेडिकल काॅलेज आणि रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डाॅ. जनक राज यांनी सांगितले की, वीरभद्र सिंह यांच्या मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते.
वीरभद्र सिंह यांना १३ एप्रिल रोजी कोरोना विषाणुंचे संक्रमण झालेले होते. त्यावेळी त्यांनी मोहालीच्या मॅक्स रुग्णालयता नेण्यात आले होते. वीरभद्र सिंह यांनी ९ वेळा आमदार आणि ५ वेळा खासदार होते. आणि ६ वेळा हिमाचल प्रदेशच मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेले होते.