कोल्हापूर : दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईचे तुकडे करून खून करणाऱ्या नराधमास जिल्हा न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली. सुनील रामा कुचकोरवी (वर ३५) असे त्याचे नाव आहे.
कवळा नाका येथील वसाहतीत सुनील कुचकोरवी हा राहतो. त्याने २८ ऑगस्ट २०१७ रोजी आईने दारूला पैसे दिले नाहीत म्हणून तिचा तुकडे करून निघृण खून केला. त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात कुणाचा गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी केला. या खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायाधीश (वर्ग ४) महेश जाधव यांच्या न्यायालयात सुरू झाले. सरकार पक्षातर्फे ऍड. विवेक शुक्ल यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सुनीलला दोषी ठरवले. त्याला जन्मठेप की फाशीची शिक्षा याबाबत दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाला होता. न्यायालयाने आज सुनील ने केलेले कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे असल्याचे नमूद करून त्याला फाशीची शिक्षा सुनावली.