निपाणी : निपाणी येथील रोहिणीनगरात अज्ञात चोरट्याने घर फोडून दोन लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. घरमालक विनायक पाटील यांनी बुधवारी पोलिसांत फिर्याद दिली आहे. विनायक पाटील यांचे मूळ गाव गोंदिकुपी असून त्यांचे आई – वडील गोंदिकुपी येथे राहतात. विनायक पत्नी व मुलांसमवेत रोहिणीनगर येथे भाडोत्री बंगल्यामध्ये राहतात.
7 जून रोजी रात्री पाटील वडिलांची तब्येत ठिक नसल्याने बंगल्याला कुलूप लावून आपल्या मूळगावी गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी करून तिजोरीतील 3.5 तोळ्याचे सोन्याचे तसेच चांदीचे दागिने व रोख रक्कम 25 हजार असा एकूण सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास करून पोबारा केला. ही घटना शेजारील नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी पाटील यांना सकाळी माहिती दिली.
दरम्यान, पाटील वडिलांच्या उपचारासाठी बाहेर होते. त्यामुळे बुधवारी (23 जून) विनायक पाटील यांनी शहर पोलिसांत चोरी झाल्याची फिर्याद दिली. घटनास्थळी सीपीआय संगमेश शिवयोगी, उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांच्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी पाहणी केली. शहराबाहेरील भरवस्तीत रोहिणीनगरमध्ये हा चोरीचा प्रकार झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक कुंभार करत आहेत.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …