शुभमंगल सावधान: इच्छुकांच्या लग्नकार्याला आता होणार सुरुवात
निपाणी (वार्ता) : दिवाळीला धनधान्याच्या रूपाने लक्ष्मी घरी आली. अशातच परतीचा पाऊस होऊन थंडीला सुरुवात झाली. त्यानुसार कार्तिक प्रबोधनी एकादशीला शहर आणि परिसरात शनिवारी (ता. ५) सायंकाळी तुळशी विवाह सोहळा पार पडला. त्या निमित्ताने यंदाच्या लग्नाच्या हंगामातील पहिली मंगलाष्टिका नागरिकांच्या कानावर पडली. तुळशीचे लग्न लावल्यानंतर ‘शुभ मंगल सावधान’ करायला हरकत नाही, असे समजून आता मुलामुलींच्या लग्नाचे बार उडविण्याला सुरुवात होणार आहे.
शहर आणि परिसरात शनिवारी सकाळपासूनच घरोघरी तुळशी विवाहाची लगबग सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर तुळशी वृंदावनाच्या कुंडीची घरोघरी रंगरंगोटी केली होती. त्यावर बोर, चिंच, आवळा, हिरव्या बांगड्या घालूनकृष्णदेव सावळा असे लिहिले होते. कुटुंबातील कर्ताव्यक्तीनी तुळशी व कृष्णाची पूजा करूनत्यांना हळद व तेल लावून मंगलस्नान घातले. तुळशीला नवीन वस्त्र नेसवले होते. हिरवा मांडव म्हणून उस आणि ज्वारीचे धाटे लावली होती. शिवाय दिवाळी मधील फराळ ही नैवेद्य म्हणून ठेवला होता. यावेळी त्बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून विवाह लावला. यावेळी कर्तापुरुषांनी कन्यादान केले. मंत्रपुष्प व आरती करून ‘शुभमंगल सावधान’ म्हटल्यावर फटाक्यांच्या आतषबाजी करण्यात आली. यावेळी शेजाऱ्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.
—
आता उडणार लग्नाचे बार
दोन वर्षापासून कोरोनामुळे अनेक इच्छुक विवाहपासून दूर राहिले होते. वर्षभरापासून संसर्ग कमी झाल्याने तुळशी विवाहाची सर्वजण वाट पाहत होते. तुळशी विवाह पार पडला असून आता शिक्षकांचे लग्नाचे बार उडणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta