सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर, रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 85 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सिस्टर ए. एच. नदाफ यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्षा अर्चना कोगनोळे यांनी दीप प्रज्वलन केले. त्यानंतर बोलताना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बेन्नी म्हणाले की, कर्नाटक सरकार, जिल्हा पंचायत बेळगाव, जिल्हा आरोग्य कुटुंब कल्याण इलाखे बेळगाव, चिकोडी व बीम्स बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रक्तदान केल्यामुळे आपण एक प्रकारची समाजसेवाच करत असून प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करणे आवश्यक आहे.
यानंतर रक्तदान शिबिरास सुरुवात झाली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत येणाऱ्या गावातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सौंदलगा, कुरली, आडी, आप्पाचीवाडी, यमगर्णी यांनी विशेष सहकार्य केले. या रक्तदान शिबिरास चिकोडी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. गडद यांनी भेट देऊन 85 नागरिकांनी रक्तदान केल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रशंसा केली. यावेळी 85 रक्तदात्यांनी रक्तदान केल्यामुळे सौंदलगा प्राथमिक आरोग्य केंद्राने चिकोडी तालुक्यात रेकॉर्ड केले.
हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बेंन्नी, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल कुलकर्णी, सिस्टर पी. एम. सोनावनी, अश्विनी इंगवले, एस. एस. अंकलगी व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व स्टाफने सहकार्य केले. त्याबरोबरच रक्तदान मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी आशा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिरासाठी सौंदलगा ग्रामपंचायतकडून रक्तदात्यांना नाष्टा व जेवणाची सोय केली होती.
Belgaum Varta Belgaum Varta