युवा नेते उत्तम पाटील : अरिहंत चषक फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना ऊर्जा देण्यासाठी अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून निरंतर पणे विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये टॅलेंट आहे. त्यामुळे त्यांना पाठबळ देण्यासाठी अरिहंत उद्योग समूह नेहमी त्यांच्या पाठीशी आहे. युवा वर्ग खेळाकडे वळण्यासाठी सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या सहकार्याने भावी काळात सहकार शैक्षणिक धार्मिक क्षेत्रासह क्रीडा क्षेत्रालाही सहकार्य करण्याची ग्वाही बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली. युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अरिहंत उद्योग समूह यांच्या नेतृत्वाखाली व निपाणी फुटबॉल अकॅडमीच्या सहकार्याने शनिवारी (ता.१२) सायंकाळी येथील समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर आयोजित ‘अरिहंत’ चषक फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करून ते बोलत होते.
प्रारंभी राज्य पातळीवरील फुटबॉल खेळाडू ओंकार शिंदे यांनी प्रास्तावित केले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार झाला. यावेळी समर्थ मंडळ व्यायाम शाळेचे अध्यक्ष धनंजय मानवी, डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी, डॉ. सुनील ससे, अविनाश मानवी, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी व मान्यवरांच्या हस्ते मैदान पूजन झाले. यावेळी पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते खेळाडूंच्या जर्सीचे अनावरण झाले.
नगरसेवक विलास गाडीवर यांनी, ग्रामीण भागातील खेळाडूंना चालना मिळण्यासाठी अरिहंतर्फे या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या पुढील काळात निपाणी मतदारसंघ त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगितले.
अरिहंत चषकचा पहिला सामना बेळगाव बुफा विरुद्ध कोल्हापूर येथील आर. के. नगर संघामध्ये झाला. या सामन्यात बेळगाव संघाने १-० अशी आघाडी घेऊन विजय मिळविला.
स्पर्धेचा दुसरा सामना कोल्हापूर येथील बालगोपाल विरुद्ध बेळगाव साईराज या संघांमध्ये झाला. बालगोपाल संघाने उत्कृष्ट खेळ दाखवत ४-० असे गोल फरक करून विजेता संघ ठरला. तिसरा सामना निपाणी फुटबॉल अकॅडमी विरुद्ध
मंगळवार पेठ मिरज या संघांमध्ये होऊन बरोबरी झाली. हा सामना पेनल्टी शूट आउटवर मिरज विजयी ठरला.
यावेळी नगरसेवक संजय सांगावकर, माजी सभापती सुनील पाटील, अशोककुमार असोदे, जयवंत कांबळे, अभय मगदूम, अनिल गुरव, नगरसेवक डॉ. जसराज गिरे, दत्ता नाईक, शौकत मनेर, शेरू बडेघर, संजय पावले, चेतन स्वामी, निरंजन पाटील -सरकार, गजानन कावडकर, राजेश देसाई सरकार, प्रतिक शहा, अनिल गुरव, शोभा हावले, सुरेखा घाळे, सुजाता पाटील, गिरीजा वठारे, सचिन पोवार, विश्वनाथ पाटील, शशिकांत नेसरे, ॲड. अमर शिंत्रे, रघुनाथ चौगुले, पिंटू पाटील, दीपक सावंत, सचिन खोत, शिरीष कमते, दिलीप पठाडे, इम्रान मकानदार, यांच्यासह निपाणी शहर आणि परिसरातील फुटबॉल प्रेमी उपस्थित होते. सचिन फुटाणकर यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta