निपाणी (वार्ता) : कणगला येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी बांधलेले महालक्ष्मी मंदिरामध्ये कार्तिक मासेनिमित्त कार्तिक दीपोत्सव पार पडला. दत्ताजीराव खाडे यांनी स्वागत केले.
मंदिरामध्ये समईचे गुरव यांच्यासमवेत पूजन करण्यात आले. श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून दीपोत्सवची सुरुवात करण्यात आली. जमलेल्या भाविक आणि महिलांनी मंदिरांमधील दिव्याने दिवे लावून दिवे लावून मंदिर परिसर उजळून काढला होता. त्यानंतर देवीची महाआरती करण्यात आली. श्रीमंत निपाणकर यांच्या हस्ते फटाक्यांची आतषबाजीकरण्यात आली.
शेजारीच असलेल्याअसलेल्या नरसिंह मंदिरांमधील मंदिरामध्ये दीप उत्सव साजरा करण्यात आला. राजेंद्र कमते, व बापू कमते यांच्या हस्ते श्रीमंत दादाराजे निपाणकर आणि युवराज सिद्धोजीराजे निपाणकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास निपाणकर घराण्याच्या राजकुमारी श्रीमंत ऋतंबराराजे निपाणकर, अश्विनी गायकवाड, सुजित गायकवाड कमते गुरुजी, संजय कमते, दत्ताजीराव खाडे, सुनील तेली, राजेंद्र कमते, संदीप तेली, महावीर कमते, सर्जेराव हळप, बाळासाहेब कमते, राजेंद्र जैन, सुरेश गुरव, संजय कमतर, राजेंद्र कमटे, बाळासाहेब कामटे, वासू कामटे, अरविंद कमते, दत्ता खाडे, भारती खवणे, विमल कमते, जयश्री कमते, श्रीलेखा हळद, अनिल चोपडे, सुनील तेली, संदीप तेली राजेंद्र जैन यांच्यासह भाविक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta