उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य :१९ संघांचा सहभाग
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बोरगाव येथील बिरदेव मंदिरमध्ये आयोजित ढोल वादन स्पर्धेत ढोणेवाडी येथील अक्कमहादेवी वालुग मंडळांने प्रथम क्रमांक पटकावून रोख ११ हजार १ रुपयांचे बक्षीस मिळवले. अभिनंदन पाटील यांचे चिरंजीव युवराज पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेत कर्नाटक महाराष्ट्रातील १९ संघांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत बाळूमामा वालुग मंडळ-आरग, संतुबाई वालुग मंडळ-हेरवाड, अण्णा महाराज वालुग मंडळ-दत्तनगर यांनी अनुक्रमे द्वितीय ते चतुर्थ क्रमांकाची ७ हजार १, ३ हजार १, आणि २ हजार १ रुपयांची बक्षीस मिळवली. तर उपळावत येथील लक्ष्मी वालुग मंडळाने उत्तेजनार्थ बक्षीस पटकाविले.
विजेत्या संघांना नगरसेवक संगाप्पा ऐदमाळे, संजय कुडचे, दीपक माळगे व मानवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. पंच म्हणून तुकाराम हिरेकुडे, क-याप्पा गावडे यांनी काम पाहिले. यावेळी राजू ऐदमाळे, म्हाळाप्पा गावडे, सोमराया गावडे, राजू माळगे, गोवर्धन हिरेकोडी, विठ्ठल ऐदमाळे, आनंद ऐदमाळे, राजू पुजारी, रमेश जमशट्टी, अनिल माळगे, मुरारी ऐदमाळे, बाबासाहेब खोत यांच्यासह धनगर समाज बांधव व नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta