सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाखेला सौंदलगा व भिवशी येथील आजी-माजी सैनिक संघटनेकडून देणगी देण्यात आली.
यावेळी सहाय्यक शिक्षक एस. व्ही. यादव यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी चेअरमन रघुनाथ चौगुले हे होते.
यावेळी माजी मुख्याध्यापक एस. डी. पाटील व कार्यरत मुख्याध्यापक जे. एस. वाडकर यांनी मनोगतात देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सुभेदार सदाशिव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
या सर्व आजी-माजी सैनिकांची सौंदलगा हायस्कूलमध्ये 14 ऑगस्ट रोजी बैठक झालेली होती. त्यावेळी या सैनिकांनी आपण या शाळेच्या ऋणातून मुक्त होण्याच्या दृष्टीने व शैक्षणिक कार्याला सहकार्य करावे या भावनेने देणगी देण्याचे जाहीर केले होते. त्या पद्धतीने 54 आजी-माजी सैनिकांनी प्रत्येकी 2500 रू. प्रमाणे 135000 रू .इतकी रोख रक्कम दिली.यावेळी सौंदलगा येथील सेवानिवृत्त सुभेदार केदारी विठू भानसे यांनी 5000 रुपये रोख देणगी दिली. या कार्यक्रमात आजी माजी सैनिकांनी संघटनेच्या कार्याबद्दल व पुढील धोरणाच्या दृष्टीने चर्चा केली.
देणगी जमा करण्यासाठी रावसाहेब रणदिवे, शिवराम भानसे, तानाजी वाकृसे, सुभेदार सुधाकर दिंडे, प्रदीप पोतदार, नामदेव पाटील, मनोहर म्हाळुंगे, भिवशी यांच्यासह अनेक सैनिकांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी सर्व आजी माजी सैनिक व स्कूल कमिटी सदस्य संजय शिंत्रे, अजित पाटील, निवृत्ती साळुंखे यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन एस. व्ही. यादव यांनी तर आभार बी. एम. शिंत्रे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta