सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पतीन संघात 69 वा सहकार सप्ताह प्रारंभ.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघाचे सचिव बाळासाहेब रणदिवे यांनी सर्वांचे स्वागत केले. यानंतर व्हा. चेअरमन डॉ. संजय आडसूळ यांनी ध्वज पूजन करून, ध्वजारोहण केले. यावेळी बोलताना संघाचे विद्यमान चेअरमन संजय शिंत्रे म्हणाले की, तारीख 14 पासून सहकार सप्ताहास सुरुवात झाली असून तारीख 20 पर्यंत हा सप्ताह सुरू राहणार आहे. या सप्ताह निमित्त सहकाराचा सप्तरंगी ध्वज सात दिवस इमारतीवर फडकत राहणारा असून, संघाच्या सभासदांनी संघास भेट द्यावी. त्याचप्रमाणे संघामध्ये ठेवी ठेवण्यासाठी व विविध कर्ज योजनांच्या माहितीसाठी सभासदांनी भेट द्यावी.
यावेळी संचालक आप्पासाहेब ढवणे, डॉ. तानाजी पाटील, संभाजी साळुंखे, विमल पाटील, सबगोंडा पाटील, महादेव कांबळे, भारतसिंग रजपुत, राजश्री मोरे, अंजना नाईक, बाळासाहेब चौगुले, रघुनाथ मोरे, अशोक पाटील, वसंत पाटील, बंडा हातकर, मच्छिंद्र पाटील, नामदेव माळी, आनंदा गुरव, बाळासाहेब काळुगुडे, सुनील बोरगावे, जयसिंग पाटील व संघाचे सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta