सौंदलगा : सौंदलगा येथील बाजारपेठेतील रस्त्याची चाळण रस्त्याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष, रस्त्यावरील खडे उखडून निघाल्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवत असताना कसरत करावी लागत आहे. पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे.
सौंदलगा गाव हे पंचक्रोशीतील मध्यवर्ती ठिकाणी असून या गावातूनच आडी, बेनाडी, भिवशी, जत्राट, या गावातील नागरिकांना जावे लागते. त्याबरोबरच मंगळवारी येथे मोठ्या प्रमाणात बाजार भरतो. त्यावेळी कुरली, भाटनांगनुर येथील नागरिक बाजारासाठी बाजारपेठेत येत असतात, या बाजारपेठेतील रस्त्याची दुर्दशा झाली असून हा रस्ता बरेच वर्ष झाला नाही. त्यातच कोरोनाच्या काळात या रस्त्याचे कामकाज, डागडुजीही झाली नाही. त्यामुळे रस्त्याची पूर्ण दुर्दशा झाली असून त्यातून दुचाकी, चार चाकी वाहने या रस्त्यावरून गेल्यावर रस्त्याचे खडे निघून गाडी स्लीप होताना दिसत आहे. वयस्कर व्यक्तींना चालत जाणेही अवघड झाले आहे. यातच जलजीवन मिशनचे काम सुरू असून, जलजीवन मिशन कामामुळे रस्ते उखडले आहेत, त्याचीही रिपेरी केली नाही. त्यामुळे रस्त्याचे खडे पुर्णतः खडून बाहेर पडले आहेत. ग्रामपंचायतीने राष्ट्रीयमहामार्ग ते झेंडाचौक पर्यंतचा व झेंडाचौक ते मांगुर बसस्थानकापर्यंतचा रस्ता दुरुस्त करणे व डांबरीकरण करणे अत्यावश्यक आहे.
या रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने मातीचा धुळा उडत असून दगड बाहेर आलेले आहेत. बाजारपेठेतील रस्त्यावरून गाडी गेल्यावर गाडी धुळ उडवत आहे. ती धूळ दुकानात साचली जात आहे. त्याप्रमाणे बाजारपेठेतील घरातील धुळीचे साम्राज्य माकले आहे. त्यामुळे व्यापारी वर्गासह नागरिकांनाही त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे व्यापारी वर्गासह, नागरिकांतून ही राष्ट्रीयमहामार्ग ते झेंडाचौक पर्यंतचा व झेंडाचौक ते मांगुर बसस्थानकापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करावा अशी मागणी होत आहे.
गावातील बाजारपेठेतील हा मुख्य रस्ता असून, याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष झाले आहे. हा रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण करणे गरजेचे आहे. या रस्त्यावरून वाहनाने तर प्रवास करणे अवघडच आहे. मात्र त्याबरोबर साधे चालत दुकानला जाणे सुद्धा अवघड झाले आहे. याकरता ग्रामपंचायतीने या रस्त्याचे डांबरीकरण करावे.

– दत्तात्रय पाटील-नांगनुरे,चेअरमन शेतकरी दूध संस्था.
रस्ता कामाची मंजुरी मिळाली आहे.पण जल जीवन मिषणचे काम अजून पुर्ण झालं नाही. त्यामुळे काम थांबले आहे. जलजीवन मिषणचे काम पुर्ण झाल्यावर लवकरात-लवकर रस्ता कामास सुरुवात करण्यात येईल.

– जावेद पटेल, ग्रामविकास अधिकारी, सौंदलगा
Belgaum Varta Belgaum Varta