Tuesday , April 22 2025
Breaking News

एक रकमी एफआरपी दिल्याशिवाय ऊस तोडू नये

Spread the love

शेतकर्‍यांच्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांचा आदेश
निपाणी : बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कर्नाटक राज्य रयत संघटना, जिल्हाधिकारी आणि बेळगाव सर्व साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
रयत संघटनेच्या पाठपुराव्यामुळे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी मागील वर्षीची थकबाकी दिल्याशिवाय व यावर्षीची एकरकमी एफआरपी जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करु नये असे आदेश दिले आहेत. तसेच एफआरपी पेक्षा 500 जादा दराची मागणी रयत संघटनेकडून करण्यात आली. त्यामुळे शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
सध्या सणासुदीच्या दिवसात सर्व सामान्य माणसाला आर.टी.पी.सी.आर. चाचणीमुळे फार त्रास होत होता. त्यामुळे संघटनेच्या मागणीनुसार कोगनोळी येथील तपासणी नाक्यावरील चाचणी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
कोगनोळी येथील जमीन अधिग्रहण विषयावर जिल्हाधिकारी हिरेमठ हे स्वत: भेट देणार आहेत. त्यामुळे कोगनोळी येथील पिडित शेतकर्‍यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. बैठक ही सकारात्मक झाली आहे.
यावेळी या बैठकीत कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार, बेळगाव अध्यक्ष राघवेंद्र नाईक राज्य अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, निपाणी तालुकाध्यक्ष आय. एन. बेग, तालुका युवा अध्यक्ष बाळासाहेब हादिकर, कार्याध्यक्ष प्रविण सुतळे, तालुका सेक्रेटरी कलगोंडा कोटगे, कोगनोळी शाखा अध्यक्ष अनंत पाटील, सेक्रेटरी राजू पाटील, नारायण पाटील, युवराज माने, उमेश परीट, जैनवाडी शाखा अध्यक्ष नामदेव साळुंखे, कुमार पाटील यांच्यासह निपाणी तालुक्यातील शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीतील डॉ.आंबेडकर विचार मंचतर्फे निरंतर पुस्तक वाचनाने महापुरुषांना अभिवादन

Spread the love  निपाणी (वार्ता) : सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात अनेक महापुरुषांनी समाज व्यवस्था बदलण्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *