निपाणी (वार्ता) : रासाई शेंडूर येथे उत्तम पाटील युवा शक्तीचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या गुणवंतासह मान्यवरांचा सत्कार माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झाला.
गारगोटी येथे झालेल्या राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेत शेंडूर येथील श्री जय भवानी मुलींच्या लेझीम पथकाने प्रथम क्रमांक मिळाला. विद्यासागर हायस्कूल माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची मिलिटरी व डॉक्टर पदवी घेतल्याबद्दल शेंडूर ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यामध्ये आरती शिवाजी भोंगाळे यांची, आसाम रायफल्स, रामदास धनाजी धोंडफोडे यांची सीआयएसएफमध्ये, रवींद्र तुकाराम वाडेकर एसएसबीमध्ये, प्रणव मधुकर पाटील- गोंदीकुप्पी यांची एसएसबीमध्ये, स्वाती विजय मोहिते -तवंदी यांची बीएसएफमध्ये डॉ. वंदना आण्णाप्पा वरूटे यांनी बीएएमएस पदवी घेतल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.
आण्णापा वरूटे यांनी प्रास्ताविक केले माजी आमदार सुभाष जोशी, परशुराम कदम -मत्तिवडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शेंडूर ग्राम पंचायत उपाध्यक्ष रुपाली धोंडफोडे, पुंडलिक कुंभार, एस. डी. कांबळे, युवराज धोंडफोडे, तानाजी शिंदे, मारुती यादव, शिवाजी पाटील, गोपाळ सूर्यवंशी, पांडुरंग तोडकर, शिवाजी लाड, भरत ढोकरे, शिवाजी आंबोले, पांडुरंग शिंदे, गोंदीकुप्पीचे पांडुरंग पाटील, युवराज पाटील, सुनील पाटील, आप्पासो केशव पाटील, महादेव पाटील, नेताजी भोसले, ज्योती पाटील, रघुनाथ पाटील, दत्तात्रेय मोरे, तानाजी पाटील, शिरगुप्पी ग्राम पंचायत अध्यक्ष आनंदा कुंभार, एल. जी. हजारे, ग्राम पंचायत सदस्य सुनील हजारे, संदीप ढपळे, अमलझरीचे अभिजित कौंदाडे, कृष्णात बाडकर, भिवंशीचे धीरज म्हाळुंगे, गव्हाणचे रावसाहेब यमकनमर्डे, तवंदीहुन बाबासो पाटील, पंचायत सदस्य सागर गुरव, बुधलमुखहुन रावसाहेब निकम, पांगीर बी येथील मारुती माळी, प्रवीण चव्हाण, पडलीहाळहुन निलेश पाटील, यरनाळचे सुरेश घाटगे, व शेडूर, गोंदीकुप्पी, शिरगुप्पी, बदलमुख, यरनाळ, तवंदी, गव्हाण, अमलझरी येथथील कार्यकर्ते उपस्तिथ होते.
Belgaum Varta Belgaum Varta