निपाणी (वार्ता) : ७५ वा स्वातंत्र्यदिन आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या ७५व्या वाढदिवसाचे औचित्य साधून छत्रपती शाहू विद्यालय कोल्हापूर यांनी ‘कार्निवल’ …. देश मेरा रंगीला या दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल निपाणीला विशेष आमंत्रित करण्यात आले होते. पुणे, सातारा, सांगली इत्यादी शहरातून अनेक शाळा या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
गोमटेशच्या ३२ विद्यार्थ्यांनी यात आपला सहभाग नोंदवला. समुहगान, प्रश्नमंजुषा, सजावट, युगलगान, समुहनृत्य, चर्चासत्र, रांगोळी, वेशभूषा, ट्रेझर हंट, पाॅवर पाॅईंट प्रेझेन्टेशन या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या स्पर्धेत केवल पटेल (फॅन्सी ड्रेस द्वितीय), विवेक इंगळे, सौमिल नांगनूरे (ट्रेझर हंट द्वितीय) भूमी शिंदे, प्रगती पाटील (पाॅवर पाॅईंट प्रेझेन्टेशन तृतीय) क्रमांक पटकावला.
शाहीस्ता सय्यद, शोभा इंगळे, सुभाष इंगळे, मनीषा ऐवळे, स्वाती चव्हाण यांनी परिश्रम घेतले. प्राचार्य ज्योती हरदी, दिपाली जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्यांना संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील यांनी प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta