प्रा. सागर परीट : अर्जुनी येथे एनएसएस शिबिर
निपाणी (वार्ता) : मानवी जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ. ती खूप शक्तिशाली आहे. वेळेसमोर कोणीच जाऊ शकत नाही. काही वेळा जिंकण्यासाठी संपूर्ण आयुष्य निघून जाते तर कधी कधी जिंकण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. जो आपल्या जीवनात वेळेचा चांगल्या प्रकारे उपयोग करतो, तोच जीवनात यशस्वी होत, असे मत प्रा. सागर परीट यांनी व्यक्त केले.
अर्जुनी (ता. कागल) येथे आयोजित श्रमसंस्कार शिबिराच्या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी पत्रकार मधुकर भोसले होते. यावेळी पत्रकार दत्ता पाटील, प्रा.शिवाजी कुंभार, प्रकल्प अधिकारी डॉ. आर. यू. घटेकरी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रा. बी. एस. कुंभार, प्रा. ए. ए. पाटील, प्रा. व्ही. पी. पाटील, प्रा. ए. ए. कुराडे, प्रा. टी. ए. पाटील, अभिजीत साबळे होते.
प्रा. परीट म्हणाले, ‘कल करे सो आज कर’ म्हणजेच आपली कामे जी आहेत ती उद्यावर न ढकलता आज करून घेतलीच पाहिजे. आत्ताची कामे ही सद्यस्थितीत केली पाहिजेत. आपल्याकडे खूप पैसा असेल तर आपण जगातील कुठलीही वस्तू विकत घेऊ शकतो. पण निघून गेलेली वेळ विकत घेऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीने वेळेला महत्त्व देत तिचा आपल्या जीवनात चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला पाहिजे.
समीक्षा परीट स्वागत तर दिक्षा लोहार यांनी प्रास्ताविक केले. शेखर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. श्रद्धा जाधव यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta