गणपतराव पाटील : महालक्ष्मी संस्थेचा रौप्यमहोत्सव
निपाणी (वार्ता): सहकारी संस्था म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणार्या एकमेव अशा असून सहकारी संस्थामुळे सर्वसामान्यांच्या जीवनाला आधार मिळत आहे.
कुन्नूरसारख्या ग्रामीण गावात शरदचंद्र पाठक यांनी चालवलेली महालक्ष्मी सौहार्द संस्था त्यापैकीच एक आहे. या संस्थेने केवळ सहकार तत्त्व न बाळगता सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्राकडे लक्ष देऊन सामाजिक बांधिलकी जपत आदर्श निर्माण केला आहे, असे मत शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी व्यक्त केले.
कुन्नूर येथील श्री महालक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष पदावरुन ते बोलत होते.
यावेळी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, मुख्याध्यापक दत्तात्रय लवटे, तहसीलदार डॉ. मोहन भस्मे आदींनीही महालक्ष्मी संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
प्रारंभी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते झाले. सुनील चौगुले यांनी स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पाठक यांनी, कुन्नूर गावच्या सर्वसामान्य जनतेच्याव शेतकरी वर्गाच्या हितासाठी संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून केवळ सहकार क्षेत्रच न पाहता सामाजिक बांधिलकी जपत धार्मिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्राकडे विशेष लक्ष दिल्याचे सांगितले.
यावेळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार, ग्रामपंचायत अध्यक्षा वालुबाई पोवार, उपाध्यक्ष दत्तात्रय शिंदे, दत्तचे संचालक इंद्रजित पाटील, महेंद्र बागे, शेखर पाटील, विजय जाधव, रघूनाथ पाठक, संजय कुलकर्णी, रघुनाथ पाटील, आप्पासो बन्ने, मुख्याध्यापक दत्तात्रय लवटे, डॉ. सतीश लवटे, ऋतुराज निकम, सचिन कुलकर्णी, सासमिले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सभासदांना रौप्य महोत्सव वर्षानिमित्त सभासदांना चांदीचे नाणे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष रावसाहेब गळतगे, संचालक जिवंधर मगदूम, चिदानंद चौगुले, आण्णाप्पा बन्ने, महोदव कुलकर्णी, सुप्रिया गोडबोले, मीना मगदूम, सावित्री सोनार,
Check Also
जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे
Spread the love पाणी प्रश्नासाठी आत्मक्लेष आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयातून येणार कमिटी निपाणी (वार्ता) : येथील …