काकासाहेब पाटील: काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी
निपाणी (वार्ता) : विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा आणली. काळम्मावाडी करार करून हरितक्रांती घडविली. दिवंगत जानुमामा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पांगिरे गावांत अनेक विकासकामे केली. पाण्याची समस्या जाणून घेऊन नवीन तलावाची निर्मिती केली. बहुग्राम पाणी योजना मंजूर करून गावांत पाण्याची सोय केली. सुवर्णं ग्राम योजनेतून डांबरीकरण केले. त्यावेळी केलेल्या रस्त्यावर अजून आताच्या आमदाराना डांबरीकरण करता आले नाही. मंदिराच्या जीर्णोद्वारसाठी निधी दिला. समाजासाठी समाज मंदिर निर्मिती केली. मतदार संघ आबाधित राखून तालुक्याची निर्मिती केली. यापुढील काळातही मतदार संघाचा विकास करण्यास कटीबद्ध आहोत, असे मत माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
यरनाळ, पांगरे बी. गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेऊन आयोजित बैठकीत ते बोलत होते.
माजी मंत्री विरकुमार पाटील म्हणाले, निपाणी मतदार संघात काही अफवा पसरवल्या जात आहेत. पण अफवेवर कोणीही विश्वास ठेवू नये. निपाणी विधानसभा मतदार संघातून काकासाहेब पाटील हेच काँग्रेस पक्षांकडून उमेदवार असणार आहेत. कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आलेस प्रत्येक गरीबाला २०० युनिट पर्यंत वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार हे शेतकरी विरोधी आहे.
कार्यक्रमास निपाणी ब्लॉक काँग्रेस युवक अध्यक्ष अवधूत गुरव, नारायण चव्हाण, सर्जेराव जाधव, शिवाजी पाटील, जे. बी. चव्हाण, शिवाजी गुरव, ईश्वर नलवडे, ग्राम पंचायत सदस्य चेतन चव्हाण, विलास कांबळे, डी. टी. कांबळे, संदीप पाटील, सुहास बुवा, प्रशांत कांबळे, दीपक बुवा, सचिन नलवडे, अमोल शिंदे, पंडित चव्हाण, जोतिराम हवालदार यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.