बोरगाव (वार्ता) : येथील वितराग महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित प्रश्नमंजुषा व होम मिनिस्टर स्पर्धेत अंतिम क्षणी प्रीती राजगोंडा पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवून पैठणीच्या मानकरी ठरल्या. मीनाक्षी रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हळदी कुंकू कार्यक्रमाबरोबरच होम मिनिस्टर व प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात आयोजित कार्यक्रमात शेकडो महिलांनी सहभाग घेतला.
विविध प्रकारे प्रश्नमंजुषा, मनोरंजनात्मक १५ फेऱ्याहून अधिक होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आले. स्पर्धेत अनेक महिलांनी सहभाग घेतला होता. प्रीती पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवून पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर मनाली पाटील द्वितीय व अश्विनी रुगे पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळवून यावर्षीच्या विजेत्या व उपविजेत्या ठरल्या.
मीनाक्षी पाटील यांनी, वितराग महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी प्रत्येक वर्षी महिलांसाठी विविध कार्यक्रम हाती घेण्यात येतात. महिला घरातून बाहेर येऊन त्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळवा यासाठी आपण प्रत्येक वर्षी हळदीकुंकू कार्यक्रम घेतो. या कार्यक्रमात सर्वच महिलांनी सहभाग घ्यावे व आपणही विजेता होण्यासाठी प्रयत्न करावे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी वितराग महिला मंडळ व अरिहंत उद्योगसह नेहमीच तत्पर असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास विनयश्री पाटील, धनश्री पाटील, सुजाता लगारे, शुभदा पाटील, आरती शेट्टी, लता पाटील, सुरेखा घाळे, वंदना पाटील, भारती पाटील, उज्वला पाटील, शोभा हवले, सुजाता पाटील, अश्विनी मगदूम, शशिकला भोजकर, सन्मती पाटील, विनयश्री बसन्नावर, सुनिता पाटील, मंगल पाटील, ललिता पाटील, शुभांगी वठारे आशाराणी तमन्नावर, विनयश्री मगदूम, सरोजनी करोले, अनिता मगदूम यांच्या सह महिला मंडळ, भिशी मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta