‘मॉडर्न’च्या विद्यार्थ्यांची मंडलिक साखर कारखान्याला दिली भेट
निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कागल तालुक्यातील सदाशिव मंडलिक सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी साखर उद्योग जाणून घेतला.
मॉडर्न इंग्लिश स्कूलच्यामाध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ९ ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य स्नेहा घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलिक सहकारी साखर कारखाना येथे भेट घेऊन साखर उद्योगातील प्रक्रिया जाणून घेतली. यावेळी कारखान्यातील अधिकारी राहुल चिटणीस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांसह विज्ञान विभागाचे शिक्षकांना सखोल माहिती देऊन बॉयलर, मशिनरी, ग्रेडिंग मशिनरी, ऊस गाळप, साखर उत्पादन, पॅकिंग आदींबाबत माहितीदिली. याशिवाय कारखान्यांतील विविध भागातील यंत्राची माहिती समजून सांगितली. विद्यार्थ्यांनी विचारलेला प्रश्नाला चिटणीस यांनी उत्तरे दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडली.
यावेळी विद्यार्थ्यांनी साखर उद्योगातील माहिती उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त या पुढील काळात साखर उद्योगातील समस्या आणि उपाय याबाबत आपण विज्ञानाच्या माध्यमातून संकल्पना मांडण्याचे आश्वासन दिले.
या माहितीमुळे नंतर शिक्षिका स्वाती पाटील यांनी आभार मानले.
यावेळी समीक्षा शिंदे, राधिका पाटील, माधवी पाटील, कलावती मेणसे, नीतू बुवा सागर लाटकर, निहाल गवंडी आदींसह शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta