श्रीराम सेनेतर्फे आयोजन : रक्तदात्यांना हेल्मेट वितरण
निपाणी (वार्ता) : श्रीराम सेना कर्नाटक यांच्यातर्फे संस्थापक प्रमोद मुतालिक यांचा जन्मदिवस आणि हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त येथील संत नामदेव मंदिरात चिकोडीतील आदर्श ब्लड बँकेच्या सहकार्याने सोमवारी (ता.२३) रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
प्रारंभी राजू पोवार व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन झाले. बसवराज कल्याणी यांनी प्रास्ताविक केले. राजू पोवार यांनी, सध्या सर्वत्र अनेक रुग्णांना रक्ताची टंचाई जाणवत आहे. अशा काळात रक्तदान शिबिरांची गरज ओळखून श्रीराम सेनेतर्फे राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. शहर व ग्रामीण भागातील मंडळांनी अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. सुषमा बेंद्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे, श्रीराम सेनेचे जिल्हा अध्यक्ष विनय अंगरोळी यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी आदर्श ब्लड बँकेचे डॉ. देवेंद्र गुरव, विश्वनाथ खंडगावे, सचिन जाधव, अष्टक पटृणकुडे यांच्यासह सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी राजेश आवटे, अमर रजपूत, समीर पाटील, आकाश माने, अभिनंदन भोसले, अजित पाटील, बबन निर्मले, बाबासाहेब पाटील, आतिश चव्हाण, राजू पुरंत, राजू सुतार, अजित पारळे, निवास पोवार, रुपेश तोडकर, उत्तम कामते, ऋषिकेश सौंदलेकर, गजू टकेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
—
हेल्मेट वापराचा संदेश
दिवसेंदिवस सर्वत्र दुचाकी स्वरांच्या अपघातांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. हे बाब गांभीर्याने घेऊन श्रीराम सेना कर्नाटकतर्फे रक्तदात्यांना हेल्मेट भेट देऊन अनोखा संदेश दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta