कार्यकर्त्यांच्या विचारातूनच पुढील निर्णय
निपाणी : आई-वडिल आणि कार्यकर्त्यांनी आपल्याला मोठे केले असून आम्ही मोठे केले या भ्रमात कोणत्याही नेत्याने राहू नये. सुरुवातीपासून आपण आक्रमक भूमिका घेतली. मात्र गेले वर्षभर राजकारणाचा भाग म्हणून शत्रूला गाफील ठेवण्यासाठी विरोधी नगरसेवक शांत राहिले. गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपचे सरकार आहे त्यामुळे याचा निपाणीकरांना लाभ व्हावा यासाठी सत्ताधाऱ्यांना विरोध न करता कामे करण्याची सूट दिली. पण यात ते अपयशी ठरले. काही सामाजिक कार्यकर्ते म्हनविणारे सरकारी कार्यालयातील दलाल असून त्यांच्याकडून नगरसेवकांची बदनामी करण्याचे षडयंत्र सुरू आहे. कार्यकर्त्यांचा विचार घेऊनच पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी दिली.
सोमवारी सायंकाळी (ता.३०) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गाडीवड्डर म्हणाले, 2001 ला पहिल्यांदा नगरसेवक झालो तेव्हापासून आजतागायत कार्यकर्ते हाच पक्ष मानून कार्यरत आहोत. आज पर्यंत आपण जी काही पदे मिळवली ती नेत्यांनी विरोध केला असतानाही संघर्षातून मिळवली. काँग्रेसची उमेदवारी ठरवताना प्रा. जोशी तसेच नगरसेवकांचे मत घेणे अपेक्षित आहे. कोणीतरी सांगतो म्हणून त्यांचे ऐकून पक्षाने चुकीचा निर्णय घेतला तर ती चूक आपली नव्हे, असे सांगितले.
यावेळी माजी सभापती विद्यमान नगरसेवक बाळासाहेब देसाई -सरकार, शौकत मनेर, डॉ. जसराज गिरे, संजय पावले, दत्तात्रय नाईक, दिलीप पठाडे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta