बेळगाव : कोरोना काळात नागरिकांच्या मदतीसाठी धावून गेलेल्या बेळगावमधील सामाजिक कार्यकर्त्यांचा हनुमान तालीम आणि शिंत्रे आखाडा कुर्ली यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
बेळगावातील फेसबूक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर आणि हेल्प फोर निडीचे सुरेंद्र अनगोळकर यांचा सत्कार करण्यात आला. संतोष दरेकर हे नेहमी गरजूंना वेळेवर रक्त मिळावे आणि त्यांचा प्राण वाचावा यासाठी धडपडत असतात.
तर सुरेंद्र अनगोळकर हे रोज जिल्हा रुग्णालयाला गरजूंना अन्नदान करतात. तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर हे नागरिकांच्या मदतीसाठी सदैव धावून जातात. त्यांनी कोरोना काळात गरिबांना औषध किराणा सामान यासह इतर गोष्टी देऊन मदत केली त्यामुळे या तिघांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
Check Also
पंचमसाली आरक्षणासाठी १८ रोजी ‘चलो बेंगळुरू’ची हाक : बसवजय मृत्युंजय स्वामी
Spread the love बेळगाव : गेल्या वर्षभरापासून पंचमसाली समाजाचे २ए आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु …