Sunday , September 20 2026
Breaking News

जनसेवा फौंडेशन व क्षत्रिय मराठा परिषद खानापूर यांच्यावतीने स्वामी श्री श्री श्री मंजुनाथ स्वामी यांची भेट

Spread the love

खानापूर : जनसेवा फौंडेशन व क्षत्रिय मराठा परिषद खानापूर यांच्यावतीने केम्पेगौडा नगर बेंगळुरू येथील गवीपुरम गंगादेश्वर शिवमंदिरचे स्वामी श्री श्री श्री मंजुनाथ स्वामी यांची नुकतीच भेट घेतली आणि मराठा समाजाच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी अभिलाष देसाई यांनी मंजुनाथ स्वामीजींना मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याबाबत पुढाकार घेऊन प्रयत्न करण्याची विनंती केली. त्यावेळी श्री मंजुनाथ स्वामीजींनी आपण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच ते लवकरच खानापूर शहराला भेट देणार असल्याचेही म्हणाले.
यावेळी क्षत्रिय मराठा परिषदेचे अध्यक्ष अभिलाष देसाई आणि संजय भोसले उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *