बेळगाव : बेळगांव ग्रामीण भाजपच्यावतीने देसूर येथील मराठी शाळेला सात ग्रीन बोर्डाची देणगी देण्यात आली. मंगळवार दि. 25 ऑक्टोबर रोजी मराठी शाळा येथे सदर कार्यक्रम पार पाडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष रणजित पोटे यांनी भुषविले होते.
प्रारंभी मराठी शाळेच्या विद्यार्थ्यानी ईशस्तवन व प्रास्ताविक आनंद पाटील यांनी केले तर स्वागत मुख्याधापक आर. के. गुरव यांनी केले.
विधान परिषद सदस्य साबण्णा तरवाळ, विधान परिषदेचे सदस्य अरुण शहापूरी, बेळगांव ग्रामीण भाजप अध्यक्ष धनंजय जाधव यांनी सदरी ग्रीन बोर्ड शाळेला देणगी दिली आहे.
रणजित पोटे यांनी शाळेला स्पीच बॉक्स देणगी दाखल दिला.
देसूर मराठी शाळेच्या वतीन धनंजय जाधव यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रंसगी ग्रा. पं. सदस्य पंकज घाडी, दाजीबा गांवकर, अरुण काळसेकर यांची भाषणे झाली.
सदर कार्यक्रमाला एसडीएमसी सदस्य सुनिल गुरव, परशराम निट्टूरकर, राजेंद्र पाटील, रेखा वसूलकर, निशा गुरव, यलूबाई पोटे, रेखा काळूचे, देसूर ग्रामपंचायत उपाध्यक्षा स्नेहा कुंभार, सदस्या निकीता सुतार, विद्या मनवाडकर, देसूर शाळेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
सुत्रसंचलन श्री. बी. व्ही. शेळके तर आभार किरण धामणेकर यांनी मानले.
