बेळगाव : बेळगांव शहर आणि तालुका फोटो व्हिडिओग्राफर्स असोसिएशन बेळगांव यांची नुतन कार्यकारी मंडळ निवड बैठक नुकतीच पार पडली. सदर बैठक रामदेव गल्ली येथील गिरीश कॉम्प्लेक्सच्या शहीद भगतसिंग सभागृहात संपन्न झाली.
असोसिएशनच्या अध्यक्षपदी डी. बी. पाटील, उपाध्यक्ष पदी संतोष पाटील, सचिव पदी संजय हिशोबकर उपसचिव पदी नामदेव कोलेकर, खजिनदार पदी नितीन महाले, उपखजिनदार पदी सचिन गोवेकर, जनसंपर्क पदी संदीप मुतगेकर यांची निवड करण्यात आली.
संचालक मंडळात सुरेश मुरकुंबी, अमित पवार, भरमा मोटरे, सतीश मोरे, राज शिंदोळकर, अनिल बर्गे, राम परदेशी यांची निवड झाली आहे. तसेच सल्लागार म्हणून अन्वर बेग, मानिक पवार, रफीक चचडी यांची उपस्थित छायाचित्रकारांच्या सर्वानुमते टाळ्यांच्या गजरात ही निवड प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी बेळगांव शहर व तालुक्यातील छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक
Spread the love बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 …