खानापूर (प्रतिनिधी) : बांगलादेशातील हिंदूना न्याय, सरंक्षण व जिहादीवर कारवाईसाठी बांगलादेश सरकारवर दबावासाठी खानापूरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विविध हिंदू संघटनाच्यावतीने मोर्चा काढून तहसीलदाराच्या मार्फत पंतप्रधानांना व गृहमंत्र्यांना बुधवारी दि. 27 रोजी निवेदन देण्यात आले.
येथील लक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला प्रारंभ झाला. शिवस्मारकातून तहसील कार्यालयावर मोर्चाव्दारे तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदन म्हटले आहे, की हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे बांगलादेशातील हिंदू भयभित झाले आहेत. तर मुस्लिम समाजाकडून हिंदू मुलींवर अत्याचार होत आहेत. हिंदू मंदिराची नासधुस होत आहे.
निवेदन देताना कृष्णाजी भट्ट, भावकाणा लोहार यांनी बांगलादेशात हिंदूच्या अत्याचार होत आहे. याचे कथन केले. व हिंदू हे मानवता कल्याणासाठीच आजपर्यंत कार्य करत आले आहेत. हे हल्ले थांबवावेत अन्यथा हिंदी देखील संरक्षणासाठी कठोर पाऊले उचलतीलद असे सांगितले.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष संजय कुबल, पंडीत ओगले यांनी विचार व्यक्त केले.
यावेळी भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर, प्रमोद कोचेरी, किरण यळ्ळूरकर, अशोक देसाई, धनश्री सरदेसाई, राजेंद्र रायका, बाबूराव देसाई, जोतिबा रेमाणी, वसंत देसाई, लक्ष्मण बामणे, लक्ष्मण झांजरे, नंदकुमार निट्टूरकर, राजू बिळगोजी, अमोल परवी आदी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विविध हिदू संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी निवेदनाचा स्विकार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवून देण्याचे आश्वासन दिले.
Check Also
लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात चोरी!
Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात काल रात्री चोरी झाली असून …