Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी प्रथमच वैद्यकीय सेवेसाठी मोफत रिक्षा

Spread the love
मध्यवर्ती रिक्षा असोसिएशनचा उपक्रम : शहरवासीयांनी केले कौतुक
निपाणी (वार्ता) : येथील शहर मध्यवर्ती रिक्षा चालक-मालक संघटनने तर्फे आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रम
 राबविण्यात आले आहे. वैद्यकीय अडचणीच्या वेळी गरजूंना वेळेत औषधोपचार होऊन त्यांना जीवनदान मिळण्यासाठी मोफत रिक्षा वाहतूक योजना बुधवारपासून (ता.१) सुरू केली आहे. त्याचा निपाणी शहर आणि उपनगरातील नागरिकांना लाभ होणार आहे. मध्यवर्ती रिक्षा असोसिएशनच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक होत आहे.
बुधवारपासून सुरू झालेल्या या उपक्रमात शहर, परिसरातील गरजू अपंग, वयोवृद्ध आणि गरोदर स्त्रियांचा समावेश असणार आहे. उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी शहर आणि उपनगरातील रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक सर्वसामान्य कुटुंबातील आजारी व्यक्तींना रिक्षाने रुग्णालयापर्यंत जाणे कठीण होते अशाप्रसंगी संबंधित कुटुंबातील व्यक्तीने दूरध्वनीवरून असोसिएशनला कळविल्यास त्यांना तात्काळ मोफत सेवा दिली जाणार आहे.
उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी (ता.१) पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रार्थना हॉटेल शेजारील रस्त्यालगत एक वयोवृद्ध मनुष्य थंडीने कुडकुडत असून अशक्तपणामुळे त्याची तब्येत खालावली होती. त्याला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाने गरजेचे असल्यामुळे आंदोलन नगर येथील रहिवासी समाजसेवक टाऊन प्लॅनिंग सदस्य  विश्वनाथ जाधव यांनी या वृद्ध व्यक्तीस दवाखान्यासाठी घेऊन जाण्यास  सांगितले. त्यानुसार संघटनेचे सेक्रेटरी निशांत हिरेमठ यांना पाठवले. त्यांनी संबंधित रुग्णाला येथील  महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण झळके आणि विश्वनाथ जाधव यांनी दाखल केले. संघटनेचे अध्यक्ष गजानन खापे यांनी  हॉस्पिटलमध्ये संबंधित डॉक्टरांना फोन करून सांगितल्यामुळे त्वरित उपचार  सुरू केले. या वयोवृद्ध व्यक्तीचे छायाचित्र व्हाट्सअपवर व्हायरल केल्यामुळे ही सदरची व्यक्ती कुरली येथील असून ही व्यक्ती गेली दोन-चार दिवस बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. ही बातमी त्यांच्या कुटुंबीयांना कळाल्यामुळे कुरली येथील नातेवाईकांनी सदर व्यक्तीला सुखरूप घरी नेले. रिक्षा संघटनेच्या या कार्याची व मोफत सेवा कार्याची दखल घेऊन बेळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेतर्फे या कार्याचे कौतुक केले.
आतापर्यंत संघटनेतर्फे रिक्षा चालकांनी प्रामाणिकपणा दाखवण्यासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. असे कार्य करण्यास नागरिकांनी प्रेरणा दिल्यामुळे आम्ही संघटनेच्या वतीने असे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवणार आहे. त्यासाठी नागरिकांनी दूरध्वनीवरून कळविल्यास सेवेसाठी आपण तत्पर असल्याची माहिती गजानन खापे यांनी दिली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष गजानन खापे, उपाध्यक्ष प्रवीण झळके, सेक्रेटरी निशांत हिरेमठ, खजिनदार संजय शास्त्री यांचा सत्कार केला. यावेळी बेळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष नेताजी कोळी-कोगनोळी, उपाध्यक्ष अनिल चव्हाण-आडी, सेक्रेटरी धनाजी कांबळे-बुदलमुख, संजय कांबळे- हादनाळ, सिटु संघटनेचे अध्यक्ष अनिल ढेकळे, संजय कांबळे, माजी नगरसेवक नंदकुमार कांबळे, टाऊन प्लॅनिंग कमिटीचे सदस्य विश्वनाथ जाधव, परवीन नाईकवाडे, अल्लाउद्दीन जामदार व रिक्षा संघटनेचे संचालक, सभासद उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांनी न्याय, हक्कासाठी अधिवेशनातील मोर्चात सहभागी व्हावे

Spread the love  राजू पोवार यांचे भावनिक आवाहन : ‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांची निपाणीच बैठक निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *