निपाणी (वार्ता) : येथील महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेला वीरराणी कित्तूर चन्नम्मा महानाट्याचे सर्वेसर्वा कर्नाटक रंगायण अकॅडमीचे अध्यक्ष रमेश परविनायकर-धारवाड यांनी सदिच्छा भेट दिली. त्यानिमित्त त्यांचा संस्थेतर्फे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून रमेश म्हणाले, जाणता राजाच्या प्रयोगा मधूनच मला लहानपणीच वीरराणी कित्तूर चन्नम्माचे महानाट्य निर्माण करण्याचे वेड लागले होते. या महानाट्यासाठी सरकार दरबारी प्रस्ताव पाठवुन मंजूर करून घेतला. व एकाच वेळी पन्नास हजारापेक्षा जास्त लोकांनी हे महानाट्य पाहण्याचा विक्रम प्रस्थापित केला. याचा मला सार्थ अभिमान आहे. निपाणीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी मंत्री व खासदार जोल्ले दाम्पत्यानी सर्वतोपरी मदत केल्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे. मी वीरराणी चन्नम्मा घराण्याचा वंशज असून आमच्या वंशजानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसांना देखील मदत केल्याचा सार्थ अभिमान त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी, अध्यक्ष डॉ. एस. आर. पाटील, उपाध्यक्ष किशोर बाली, संचालक श्री. प्रताप एस पट्टणशेट्टी, श्री. श्रीकांत परमणे, सुरेश शेट्टी, महेश बागेवाडी, डॉ. बसवराज कोठिवाले, अशोक लिगाडे, सदानंद दुमाले, प्रताप मेत्राणी, दिनेश पाटील, पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, सदाशीव धनगर, संस्थेचे सीईओ शशिकांत आदन्नावर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta