Friday , December 8 2023
Breaking News

कोगनोळी दुधगंगा नदीत मगरीचा वावर

Spread the love

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्‍या दूधगंगा जुन्या पुलानजीक मगरीचा वावर वाढला असून शेतकर्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कोगनोळी परिसरात मगरीचे वारंवार दर्शन होत असल्याने रात्री-अपरात्री विद्युत मोटर सुरू करण्यासाठी जाणार्‍या शेतकर्‍यांच्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या पंधरा दिवसा पाठीमागे कोगनोळी नजीकच मगरीचे दर्शन झाले होते. यावेळी निपाणी तालुक्यातील वन विभागाच्या अधिकार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली होती.
मगरीचा वावर कोगनोळी परिसरात असून शेतकरी व अन्य नागरिकांनी या ठिकाणी दक्षता घेण्याचे आव्हान वनाधिकारी यांच्याकडून करण्यात आले होते.
कोगनोळी परिसरात वावरणार्‍या या मगरीला पकडून अन्य ठिकाणी सोडण्यात यावी अशी मागणी येथील शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. नदीकाठचे शेतकरी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांची भेट घेऊन वन विभागाला संबंधित माहिती देऊन मगरीचा बंदोबस करणार असल्याचे यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

ऊस दरासाठी विधानसभेवर मोर्चा

Spread the love  राजू पोवार; सुळगावमध्ये जनजागृती बैठक निपाणी (वार्ता) : ऊस, सोयाबीन पिकाला हमीभाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *