Saturday , May 25 2024
Breaking News

ऊरूसाच्या तिसर्‍या दिवशी खारीक व उदी वाटपाचा कार्यक्रम

Spread the love

मान्यवरांची उपस्थिती : पाकाळनीने उसाची सांगता
निपाणी : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपिर दस्तगिर साहेब यांच्या उरूस कोरोना महामारीमुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचीनुसार साधेपणाने साजरा करण्यात आला. ऊरूस काळात चव्हाण वारस बाळासाहेब देसाई सरकार घराण्यातर्फे आणि प्रमुख मानकरी दत्ताजीराव घोरपडे नवलिहाळकर सरकार यांच्या सुरू असलेल्या 100 वर्षांच्या प्रथेप्रमाणे नवलिहाळकर वारस संताजीराव घोरपडे सरकार यांनी लवाजम्यासह चव्हाण वाडा मूळगादी येथे आणलेला चंदनगंध चढवून ऊरूस साजरा करण्यात आला. कोरोनाची नियमावली असली आणि कोणतेही मनोरंजन, पाळणी, खेळणी साधने नसली तरीही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवित नियमावलीचे पालन करीत संत तुरबतीचे दर्शन घेतले.
दरम्यान, माजी आमदार काकासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, माजी ता. पं. सदस्य अशोक पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक अध्यात्मिक क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी भेट देवून हजरत दस्तगीर साहेबांचे दर्शन घेतले. सर्वांचे स्वागत ऊरूस कमिटीचे कमिटीचे उत्सव अध्यक्ष बाळासाहेब सरकार, सेवेकरी सुबहान मुजावर यांनी केले. पहाटे ऊरूसाच्या तिसर्‍या दिवशी चव्हाण वारसातर्फे दर्गा व मूळगादी चव्हाण वाडा येथे संग्रामसिंह देसाई सरकार, रणजितसिंह देसाई सरकार, पृथ्वीराज चव्हाण, संताजीराव घोरपडे, नवलिहाळकर सरकार, दादाराजे देसाई निपाणकर सरकार यांच्या उपस्थित लवाजमा व मानकर्‍यांच्या यांच्या उपस्थित पहाटे गंध चढवण्याचा विधी पार पडला. मूळ गादी चव्हाण वाडा येथे खारीक व उदी वाटपाचा कार्यक्रम पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भाविकांना खारीक व उदी वाटप करून पार पडला. कोरोना महामारीमुळे धार्मीक विधी वगळता सर्व कार्यक्रमांवर बंदी घातल्याने दर्गा परिसरात केवळ भाविकांचीच रेलचेल होती. हार, फुले, ऊद कापूर वगळता कोणतेही दुकाने लावण्यात आलेली नाहीत. त्यामुळे सर्वच परिसर मोकळा राहिला. नगरपालिका व पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून गर्दी टाळण्यासाठी व अनुचित प्रकार थांबविण्यासाठी काम केले.

About Belgaum Varta

Check Also

कणगला येथे नृसिंह सरस्वती जयंती निमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : कणगला येथे नरसिंह, सरस्वती यांची जयंती निमित्त विविध कार्यक्रम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *