Saturday , July 27 2024
Breaking News

शेतकर्‍यांच्या लढाऊ वृत्तीचा विजय : राजू पोवार 

Spread the love

शेतकरी विरोधी कायदे मागे घेतल्याने निपाणीत आनंदोत्सव
निपाणी : केंद्र सरकारने शेतकरीवर्गात केलेल्या तीन कायद्याच्या विरोधात रयत संघटनेसह देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी 11 महिने आंदोलन केले. तरीही केंद्र सरकारला जाग आली नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत शेतकर्‍यांनी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला होता. अखेर सरकारला नमते घ्यावे लागले असून हा शेतकर्‍यांच्या लढावू वृत्तीचा विजय असल्याचे मत चिकोडी जिल्हा राज्य संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने शुक्रवारी (ता.19) शेतकर्‍यांवरील येथील तीन कायदे मागे घेतले आहेत. त्यानिमित्त चिकोडी जिल्हा संघटनेतर्फे येथील धर्मवीर संभाजी चौकात आनंदोत्सव साजरा केला त्या प्रसंगी पोवार बोलत होते.
राजू पोवार म्हणाले, निवडणूका समोर ठेवून आता मोदी सरकारने तीन काळे कृषी कायदे मागे घेतले. पण जे अनन्वित अत्याचार बळीराजावर केले गेले. ज्या पध्दतीने त्याला देशद्रोही म्हटले गेले. जो खिळे तारांचा विळखा घातला गेला. जीपच्या टायर खाली चिरडले गेले हे शेतकरी कधीच विसरू शकणार नाही. हा मोदी सरकारच्या अत्याचार, अनाचार व प्रचंड अहंकारावर शेतकर्‍यांच्या लढाऊ वृत्तीचा, धैर्याचा आणि एकजुटीचा विजय आहे. अजूनही 148 एकर जमीन खरेदीचा कायदा मागे घेतला नाही. शिवाय शेतकरी आंदोलनात बळी गेलेल्या वारसांना मदत निधी मिळण्यासह उर्वरित शेतकर्‍यांच्या समस्या सोडू पर्यंत संघटनेचे आंदोलन सुरूच राहणार आहे. त्यासाठी भविष्यात शेतकर्‍यांनी अशाच प्रकारची एकजूट ठेवणे आवश्यक आहे.
निपाणी शहर अध्यक्ष उमेश भारमल यांनी, शेतकरी विरोधामधील काळ्या कायद्याच्या बाबत विविध शेतकरी संघटनांनी निरंतरपणे आंदोलन केले आहे त्यांच्या आंदोलनाला यश मिळाले असून यापुढील काळातही शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले.
प्रवीण सूतळे यांनी, तब्बल अकरा महिने आंदोलन केल्यानंतर शेतकर्‍याचा विजय झाला आहे. शेतकर्‍यांच्या जनजागृतीमुळे सरकारला नमते घ्यावे लागले आहे. हा सर्वांच्या एकजुटीचा विजय असल्याचे सांगितले. बाळासाहेब हादकर यांनी, हा शेतकर्‍यांचा नैतिक विजय असल्याचे सांगितले.
यावेळी सुभाष नाईक, नामदेव साळुंखे, इस्माईल मुल्ला, इरफान मुल्ला, महादेव शेळके, एजाज मुल्ला, यासीन मुल्ला, दिलीप कांबळे, युवराज केस्ती, साहिल कांबळे, पांडुरंग कोळी, बाळकृष्ण पाटील, काशीम मुल्ला, महेश पाटील, तानाजी पाटील, सुनील गाडीवड्डर, बाळासाहेब पाटील यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

व्हटकर कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

Spread the love  निपाण (वार्ता) : येथील जत्राट वेस मधील रहिवासी तिरुपती व्हटकर यांच्या अंगावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *