
शहरात विविध मार्गावरून अंत्ययात्रा
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री सिद्धेश्वर मंदिराचे मठाधिपती, अध्यात्मिकसह चिंतनशील व्यक्तिमत्व अण्णासाहेब सत्यगोंडा पाटील उर्फ अण्णा महाराज यांचे शुक्रवारी (ता.१७) निधन झाले. शनिवारी (ता.१८) महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर शहर आणि परिसरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली.
बोरगाव स्मशान भूमी येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले. महाराज यांचा मुलगा सिद्धार्थ पाटील यांनी पार्थिवाला भडाग्नी दिली.
यावेळी आयोजित शोकसभेत उत्तम पाटील यांनी, अण्णा महाराज यांनी सिद्धेश्वर मंदिराचे जीर्णोद्धार करून शहराचे सीमाभागात नावलौकिक केले आहे. त्यांच्या पुढाकाराने मंदिराचा सर्वांगीण जिर्णोद्धार झाला असल्याचे सांगितले. माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हावले, अभियंते राजेंद्र पाटील, डॉ. शंकर माळी, अभियंते ए. जी. नसलापुरे, नगर सेवक अभय मगदूम, शरद जंगटे यांनीही श्रद्धांजली वाहिली.
Belgaum Varta Belgaum Varta