Share

ममदापूरला मान्यवरांची उपस्थिती; हरिनाम सोहळ्याची सांगता
निपाणी (वार्ता) : टाळ-मृदंगांचा गजर, विठू माऊलीचा जयघोष, परिसरातील वारकऱ्यांच्या उपस्थितीत ममदापूर (के. एल. ) येथे शनिवारी (ता. ४) माऊली अश्वाचा रिंगण सोहळा झाला. त्यानंतर महाप्रसाद वाटप झाल्यावर आठवडाभर सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली.
प्रारंभी बोरगाव पिकेपीएसचे उत्तम पाटील, निरंजन पाटील-सरकार, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर-पवार, सुखदेव साळुंखे यांच्या हस्ते माऊलीच्या अश्वाचे पूजन करून सोहळ्याचे उद्घाटन झाले. त्यानंतर प्रमुख रस्त्यावरून आडवा आणि उभा रिंगण सोहळा झाला. यावेळी ममदापूर, अक्कोळ, गळतगा परिसरातील भाविक सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. रिंगण मार्गावर महिलांनी आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या.
शनिवार (ता. २५ मार्च) पासून आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणात वीणा, पालखी, प्रतिमा, ज्ञानेश्वरी, ग्रंथपूजन, काकडारती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, रात्री कीर्तन व हरिजागराचा कार्यक्रम झाला. शुक्रवारी (ता.३) अंबिका देवालयात अश्वाचे आगमन व अश्वपूजन झाले. शनिवारी (ता. ४) दिंडी काढली. दऱ्याचे वडगावमधील धोंडीराम मगदूम- महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर ११ वाजता माऊलीच्या अश्वाचा रिंगण सोहळा झाला.
यावेळी गजानन कावडकर, अभय मगदूम, अरुण निकाडे, पांडुरंग हरेल, बंडा पाटील, निवास पाटील, आप्पासाहेब गायकवाड, शिवाजी चौगुले, बाबा पाटील, सुहास पठाडे, सुधाकर चव्हाण, सुभाष हरेल, पिंटू पाटील, विणेकरी मधुकर उत्तुरे, विणेकरी कृष्णात तोडकर, संजय कागे, प्रा. सचिन खोत, अनिल संकपाळ, जिनगोंडा पाटील, संजय पाटील, अब्दुल पटेल, शिवू पाटील, अभिजीत कौंदाडे यांच्यासह ममदापूर आणि परिसरातील माळकरी, वारकरी व भाविक उपस्थित होते.
Post Views:
458
Belgaum Varta Belgaum Varta