Share
शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण
कोगनोळी : हदनाळ (तालुका निपाणी) येथील शेतामध्ये गव्या रेड्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी शेतामध्ये जाणाऱ्या शेतकरी बांधवांनी सतर्क राहून दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, हदनाळ येथील तुका पाटील आड्ड्याजवळ सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान काही तरुण वैरण आणण्यासाठी गेले होते. यावेळी शेतातून 2 गवे रेडे येत असल्याचे निखिल पाटील, अभिजीत राजगुडे, रणजीत पाटील यांच्या निदर्शनास आले. गव्या रेड्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रात्री-अपरात्रीच्या वेळी जात असतो. यासाठी शेतकरी बांधवांनी दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

Post Views:
717
Belgaum Varta Belgaum Varta