Wednesday , December 10 2025
Breaking News

शहरवासीयांच्या पाण्यापेक्षा खेळालाच महत्त्व

Spread the love

 

नगरसेवक विलास गाडीवड्डर : शहरवासीयांच्या पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष
निपाणी (वार्ता) : आपल्या कारकिर्दीमध्ये २४ तास पाणी योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले होते. पण त्यानंतर येथील नगरपालिकेमध्ये अपक्षांच्या मदतीने भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. या पाच वर्षाच्या काळात नगराध्यक्षासह सभागृहाला उर्वरित १० टक्के काम पूर्ण करता आले नाही. त्यांच्या या अपयशामुळे सध्या शहरवासीयांना चार दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. अशी परिस्थिती असताना काकडे दुर्लक्ष करून केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन करून मते मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावरूनच केवळ नागरिकांची दिशाभूल सुरू आहे. १५ मार्चपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नगराध्यक्ष आणि आयुक्तांना जाब विचारण्यासाठी सर्व समावेशक मोर्चा काढण्याचा इशारा नगरपालिके तील विरोधी पक्षनेते विलास गाडीड्डर यांनी केला. शुक्रवारी (ता.१०) आयोजित विरोधी पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते.
गाडीवड्डर म्हणाले, भाजप प्रणित सत्ता नगरपालिकेत आल्यानंतर आपण चार वेळा २४ तास पाणी पुरवठा करण्यासाठी नगराध्यक्ष, मंत्री महोदय, सभागृहाला निवेदन दिली आहेत. पण आजपर्यंत त्याला उत्तर मिळालेले नाही. शिवाय या योजनेचे पाणी कुठे सुरू आहे आणि कुठे नाही याची माहिती मागूनही त्याची पूर्तता झालेली नाही. सध्या चार दिवसातून एकदा पाणी येत असल्याने पाईप मध्ये हवा भरत आहे. पाणी आल्यानंतर केवळ हवेवरच बराच काळ मीटर फिरत असल्याने हवेचे बिल वाढत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून बील न भरणाऱ्यांना न्यायलयातर्फे नोटीसही दिल्या जात आहेत. त्यामुळे नगरपालिकेत लोकशाही नसून हुकूमशाही आली आहे. त्यामुळे २४ तास पाणी पुरवठा होईपर्यंत पूर्वीप्रमाणे पाण्याचे बिल आकारले जावे. अन्यथा पाणीपुरवठा विभाग विरोधी गटाकडे दिल्यास आपण ही योजना यशस्वी करून दाखवतो. तसे न झाल्यास राजकीय सन्यास घेण्यासही आपण आहोत. पाण्याबाबत अधिकाऱ्यांचीही अधिकारशाही सुरू आहे. सत्ताधारी व नेत्यांना नागरिकांची कुठल्याही प्रकारची तळमळ नसल्याचे यावरून सिद्ध होत आहे.
———————————————————-
विधानसभेसाठी कोणतीही भूमिका नाही

‘विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. केवळ नागरिकांच्या हित आणि विकास कामाच्या आड न येण्यासाठी आपण विरोधी गटात असूनही शांत आहोत. आपल्या कार्यकाळात नगरोत्थान योजनेतून २५ कोटीची कामे मंजूर झाली होती. मात्र सत्ताधाऱ्यांच्या काळात अजूनही त्यातील बरीच कामे शिल्लक असल्याचेही गाडीवड्डर यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक बाळासाहेब देसाई -सरकार, डॉ. जसराज गिरे, शौकत मनेर, दिलीप पठाडे, दत्ता नाईक यांच्यासह विरोधी गटातील नगरसेवक उपस्थित होते.
———————————————————-
पाणीटंचाई काळात रंगपंचमीचाही खेळ होईल
शहरातील अनेक प्रभागात अजूनही पाण्यासाठी नागरिक धडपड करीत आहेत. तरीही मूळ प्रश्नाकडे बगल देऊन विविध प्रकारचे खेळ शहरात सुरू आहेत. त्यामुळे केवळ खेळाचे प्रदर्शन करून मतदार बळी पडणार नसून विकास कामे करून त्यांचे मन वळवा. पाण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा. त्यासाठी आम्ही कधीही तयार आहोत, असा टोलाही विलास गाडीवड्डर यांनी लगावला.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत शस्त्रधारी चोरट्यांकडून धाडसी घरफोडीचा प्रयत्न

Spread the love  चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद : चोरटे धावले पोलिसांच्या अंगावर निपाणी-(वार्ता) : शहरासह उपनगरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *