निपाणी (वार्ता) : येथील मावळा ग्रुपच्या २५० सदस्यांनी राजगडला भेट देऊन या किल्ल्याची माहिती जाणून घेतली. ग्रुपच्या व्दितीय वर्धापन दिनानिमित्त या गडकोट मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी प्रतापगड व रायगड किल्ल्याला भेट देण्यात आली होती. यावर्षी सज्जनगड व राजगड मोहीम पूर्ण करण्यात आली. राजगडावर सचिन खोपडे यांनी या गडाची माहिती व्याख्यानातून सांगितली.
राजगडकडे जाण्यापूर्वी निपाणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवपुतळ्यास राहुल भाटले दाम्पत्याच्या हस्ते महाभिषेक घालण्यात आला. बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्राणलिंग स्वामींच्या हस्ते ध्वजपूजन झाले. त्यानंतर शिवाजी चौक, तानाजी चौक, कोठीवाले कॉर्नर, वीर राणी कित्तूर चन्नम्मामार्गे मावळा ग्रुपची रॅली काढण्यात आली.
वाहनांचे पूजन हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, नगराध्यक्ष जयवंत भाटले, प्रणव मानवी, नासरखान इनामदार यांच्या हस्ते झाले. मावळ्यांसाठी चारबसची सोय करण्यात आली होती. त्यामधून २५० मावळे राजगडच्या दर्शनासाठी गेले होते.
मावळा ग्रुपचे संस्थापक आकाश माने, राहुल भाटले, संजय चिकोडे, सुभाष कदम, उदय शिंदे, पृथ्वीराज घोरपडे, सुशांत कांबळे, अनिल चौगुले, सागर पाटील, शांतिनाथ मुदकुडे, राहुल गंथडे,दादा जनवाडे, उमेश गंथडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta