Share


युवा नेते उत्तम पाटील : युवा शक्तीतर्फे हळदी-कुंकू
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूह आणि यरनाळ येथील उत्तम पाटील युवा शक्ती संघाच्या संयुक्त विद्यमाने यरनाळ येथे हळदी कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी तर प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगराध्यक्ष शुभांगी जोशी, धनश्री उत्तम पाटील उपस्थित होत्या. स्वेता घाटगे यांनी यरनाळ होम मिनिस्टर पटकावले.
बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. पैठणी साडीचे बक्षीस अनिता बाबर, यांना मिळाले, अविता मोरे, टेबल फॅन बक्षीस अस्मिता घाटगे, सिलिंग फॅन खामकर यांनी पटकावले. घाटगे महाराज यांचा सत्कार करण्यात आला.
उत्तम पाटील यांनी, यरनाळ गावच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आतापर्यंत येथील नागरिकांनी आपल्याला सहकार्य केले आहे. यापुढेही सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले. प्रा. सुभाष जोशी, सुयोग जोशी, श्रीकांत ढापळे, व राजेंद्र गुरव तवंदी यांनी मनोगत केले. अतुल गुरव यांनी आभार मानले. यावेळी नवनाथ घाटगे महाराज यांचा सत्कार झाला.
यावेळी यरनाळ ग्राम पंचायत सदस्य राजू घाटगे, सुरेश घाटगे, बाबुराव पोवार, संदीप संकपाळ, प्रदीप लकडे, नंदकुमार जोशी, गणपती घाटगे, दिलीप पठाडे, राजू पाटील, निरंजन पाटील -सरकार, आनंदा कुंभार, बाबासाहेब पाटील, दिनकर लाटकर, पांडुरंग पोवार, सुधाकर पोवार, संतोष पोवार, दादू पोवार, बाळासाहेब घाटगे, अवबा पोवार, नारायण गुरव, श्रावण मधाळे, आण्णासो घाटगे, संजय डोणे, प्रशांत गुरव, पांडू गुरव, डॉ. चंद्रकांत डावरे, एकनाथ घाटगे यांच्यासह उत्तम आण्णा युवा शक्ती अध्यक्ष, सदस्य, सर्व युवक मंडळ सदस्य, स्व सहाय्य संघ सदस्य, अरिहंत बँके संचालक व उत्तम आण्णा प्रेमी उपस्थित होते.
Post Views:
854
Belgaum Varta Belgaum Varta