मतदारसंघातील विविध गावांना भेटी; मतदारांचा वाढता प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : विधानसभा मतदारसंघातील निधर्मी जनता दल पक्षाचे अधिकृत उमेदवार व रयत संघटना चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी वेळोवेळी शेतकरी कष्टकरी गोरगरीब यांच्या न्याय हक्कासाठी मोर्चे आंदोलने प्रसंगी आक्रमक भूमिका घेऊन आपली वेगळी छाप निपाणी विधानसभा मतदारसंघांमध्ये केलेली आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी निजद पक्षाची उमेदवारी राजू पोवार यांना दिलेली आहे. यासाठी आपला प्रचार करण्यासाठी राजू पोवार सर्व रयत संघटना व निधर्मी जनता दलाचे कार्यकर्ते निपाणी क्षेत्रातील ढोणेवाडी, मानकापूर, आप्पाचीवाडी, कुन्नूर, मांगुर, भोज या गावांमध्ये भेट देऊन मतदारांशी निधर्मी जनता दल पक्षाचे ध्येय धोरणे पटवून देऊन माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक राज्यामध्ये सरकार कोणाचे जरी असेल तर मुख्यमंत्री कुमारस्वामीच होणार असल्याचे सांगितले.
कुमारस्वामी यांनी केलेल्या लोकाभिमुख कार्याची ओळख विविध योजनाची माहिती घरोघरी पोहोचवून येणाऱ्या काळामध्ये मला बहुमताने विजयी करून विधानसभेत पाठवा असे आवाहन केले. कर्नाटक राज्यामध्ये माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली पंचरत्न योजना राबवून सर्वसामान्य जनतेचे हित साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार असल्याचे राजू पोवार यांनी सांगितले.
निपाणी मतदारसंघातील गावांमध्ये पोवार यांना वाढता प्रतिसाद मिळत असून त्यांचा प्रचार झंझावात सुरू असल्याची चर्चा भागात सुरू आहे. यावेळी निधर्मी जनता दलाचे कार्यकर्ते व रयत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta