Wednesday , December 10 2025
Breaking News

भ्रष्टाचारी डबल इंजिन भाजप सरकारला हद्दपार करा

Spread the love

 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण : कोगनोळीत काँग्रेसची प्रचार सभा

निपाणी (वार्ता) : राज्य आणि केंद्र सरकारमध्ये भ्रष्टाचारी सरकार कार्यरत कमिशन घेणाऱ्या सरकारकडून सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. राज्याला जाज्वल इतिहास असताना भ्रष्टाचाराचा कलंक लावला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ कोगनोळी येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीरकुमार पाटील होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजपने सत्ता काळात केवळ आश्वासने दिली आहेत. शिवाय महागाई वाढविल्याने सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. येथील मंत्र्यांनी अंडी घोटाळा करून नवा विक्रम केला आहे. काकासाहेब पाटील यांच्याकडे पैसा नसला तरीही माणुसकी आहे. त्यांच्यामुळेच काळम्मावाडीचा करार पूर्ण झाला असून यापुढील काळातही निरंतरपणे कर्नाटकाला पाणी दिले जाईल. राज्याने देशात बदलाचे वारे सुरू असून भ्रष्टाचाराचे डबल इंजिन असलेल्या सरकारला या निवडणुकीत हद्दपार करा.
वीरकुमार पाटील म्हणाले, ही निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्तीची आहे. काकासाहेब पाटील एकटे नसून ते निष्कलंक असल्याने त्यांनाच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळाले आहे. ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असल्याने काकासाहेब पाटील निवडून येणार यात कोणती शंका नाही.
उमेदवार काकासाहेब पाटील म्हणाले, भाजपाच्या आमदार दहा वर्ष सत्ता असूनही शाश्वत कामे करता आली नाहीत. काळमवाडी करारातून ४ टीएमसी पाणी दिले असून २ टीएमसी पाणी त्यांना आणता आले नाही. या निवडणुकीत आपण विजयी होऊन निपाणी मतदारसंघातील काँग्रेस पक्षाला बळकटी आणण्यासाठी नेतृत्वांना पुढे आणणार आहे. काँग्रेस पक्षाचे निरीक्षक मोहन जोशी, राजेंद्र वड्डर, प्रकाश कदम, सुमित्रा उगळे, पंकज खोत, अनिल कुरणे, कुमार माळी, संजय कोळी यांनीही मनोगत व्यक्त केले.
पंकज पाटील यांनी स्वागत केले.
सभेस राजेश कदम, रोहन साळवे, बसवराज पाटील, लक्ष्मण इंदलकर, बाळासाहेब कागले कागले, ग्राम पंचायत अध्यक्षा वनिता खोत, उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, सदस्य राजगोंडा पाटील, सचिन खोत, पद्मा पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्या अमृता पाटील, अनिल चौगुले, बाबूराव खोत, संजय पाटील, सुप्रिया पाटील,
संभाजी पाटील, अरुण पाटील, अनिल कुरणे, राजश्री डांगरे, रुपाली आवटे, नेताजी पाटील, दत्तात्रय पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य प्रितम पाटील कृष्णात खोत, विश्वजीत लोंखंडे, संतोष पाटील, दिलीप पाटील, युवराज कोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
————————————————————–
काळमवाडी करार झाल्यामुळे निपाणी भागातील नद्यांना बारमाही पाणी उपलब्ध झाले आहे. या पाण्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आप्पाचीवाडी येथील शेतकऱ्यांनी ५१ हजार रुपये तर कोगनोळी येथील ग्रामपंचायत सदस्यांनी काकासाहेब पाटील यांना १ लाख रुपयाचा धनादेश निवडणुकीसाठी दिला.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत शस्त्रधारी चोरट्यांकडून धाडसी घरफोडीचा प्रयत्न

Spread the love  चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद : चोरटे धावले पोलिसांच्या अंगावर निपाणी-(वार्ता) : शहरासह उपनगरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *