Share
उमेदवार उच्चशिक्षित असल्यामुळे नागरिकांच्या आशा वाढल्या.
निपाणी (वार्ता) : नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व निपाणी विधानसभेच्या रिंगणात उतरलेले आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ. राजेश बनवन्ना यांना निपाणी येथील पाटील मळ्यातून आठ ते दहा कुटुंबाचा जाहीर पाठिंबा मिळवलेला असून आम आदमी पार्टीची ताकद निपाणी विधानसभा क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याचे आश्वासक चित्र निर्माण झाले आहे.
पाटील मळ्यातील अनेक नागरिकांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की आमच्या मळ्यातील आठ ते दहा कुटुंबाने जो काय पाठिंबा दिला आहे त्याची कैफियत अशा आहे की आज पर्यंत निवडून आलेल्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आमच्या मळ्यावर फक्त आश्वासनाची खैरात केली आहे पण प्रत्यक्षात कार्यवाही शून्य केली आहे. त्यांनी स्वतःचा विकास केला आहे. पण सर्वसामान्य कुटुंबे देशोधडीला लावलेली आहेत. त्यामुळे आम्ही आता निर्धारच केला आहे की यावेळी आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राजेश बनवन्ना यांना जाहीर पाठिंबा देऊन त्यांच्या “झाडू” या चिन्हा समोरील बटन दाबून आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण डॉ. राजेश बनवन्ना यांच्या रूपाने न्याय देणारा, अधिकाऱाची जाणीव करून देणारा, सुविधा निर्माण करणारा, प्रामाणिक व तत्वनिष्ठ पक्षाचे उमेदवार असून याची आम्हाला खात्री झाली असून त्यामुळे आम्ही इथून पुढील काळात कोणत्याही आमिषाला बळी न पडता डॉ. बनवन्ना यांच्या मोहिमेला बळकटी देऊन पक्षाला बळकटी देण्याचे सुतोवाच केले.
कार्यक्रमास वसीम पठाण, आदर्श गिजवणेकर प्रा. कांचन बिरनाळे पाटील, कविता आवटे, महेश कगळे, बंडू साळवे, यांच्यासह पाटील मळ्यातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views:
623
Belgaum Varta Belgaum Varta