वाहनधारकांना धोका : दुरुस्तीची मागणी
कोगनोळी : येथील मुख्य बस स्थानकावर गेल्या अनेक दिवसापासून गटारीचे काम रखडले आहे. यामुळे वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा मागणी करून देखील गटारीचे काम पूर्ण होत नसल्याने या गटारीला वाली कोण आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये कुंभार गल्ली, मुख्य रस्ता येथील पाणी मोठ्या प्रमाणात येत आहे. येथील गटार लहान व पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने पाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले होते. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये गटारीचे काम करून मिळावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती. याबाबतची मागणी माध्यमाच्या माध्यमातून झाली होती. या सर्वांची दखल घेऊन ग्राम पंचायतने सदर गटात तयार करण्यासाठी जेसीबीच्या साह्याने मुख्य रस्त्यावर खड्डा काढला आहे. गेली दोन-तीन महिने झाले. तरी या ठिकाणची गटार दुरुस्ती करण्यात येत नाही. येथील मुख्य रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने काढण्यात आलेला खड्डा धोकादायक स्थितीत आहे. यासाठी ग्रामपंचायतीने ताबडतोब गटार दुरुस्त करून या ठिकाणी काढण्यात आलेला खड्डा मुजवून घ्यावा व नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.
महामार्गावर असणारा टोल नाका चुकून कोगनोळी मार्गे निपाणी व निपाणी हून कागल, कोल्हापूर कडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. रात्रीच्या वेळी वाहने ये जा करत असताना खड्डा लक्षात येत नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या सर्वांची दखल घेऊन ताबडतोब गटार दुरुस्त करून मिळावी अशी मागणी होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta