केएलईच्या दीक्षांत समारंभात गौरव: निपाणी परिसरातून कौतुक
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील केएलई विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत समारंभ सोमवारी (ता.५) बेळगाव येथील केएलई शताब्दी स्मृती सभागृहात पार पडला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली. कुलपती डॉ. प्रभाकर कोरे, केएलई संस्थेचे अध्यक्ष महांतेश कौजलागी, केएलई विद्यापीठ आणि केएलई संस्थेचे बोर्ड सदस्य उपस्थित होते.
केएलई विद्यापीठ मधील निपाणी तालुक्यातील कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालयाची बेनाडी येथील शेतकऱ्याची मुलगी अनुजा सदाशिव जनवाडे हिला अयुर्वेदिक मेडिसिन (बीएएमएस) मध्ये तीन सुवर्ण पदके मिळाली. त्यामुळे तिचे बेळगाव आणि निपाणी परिसरातून कौतुक होत आहे.
अनुजा ही बेनाडी सारख्या ग्रामीण भागात राहून शेतकरी कुटुंबात असूनही जिद्द चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर लख्ख मिळविले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य समस्या मोठ्या प्रमाणात असल्याने या पुढील काळात ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्याचा मानस डॉ. अनुजा जनवाडे हिने व्यक्त केला आहे.
या दीक्षांत समारंभात १९ विद्यार्थिनींसह २३विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकावली आहेत. यावेळी १४५०विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. याशिवाय पीएच.डी. ४४४ विद्यार्थी, पदव्युत्तर ९८२ पदवीधर, २ पी.जी. डिप्लोमा, ९ पोस्ट डॉक्टरेट आणि विद्यार्थी – प्रमाणपत्र अभ्यासक्रमात यशस्वी यशस्वी झाले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta