शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करणार : जुन्या आठवणींना उजाळा
निपाणी (वार्ता) : शाळा, कॉलेजचे दिवस संपल्यावर प्रत्येकजण आपापल्या जीवनात वेगळ्या क्षेत्रामध्ये मग्न होऊन जातो. तरीही शाळेतील आठवणी आणि गप्पा-गोष्टीना उजाळा देण्यासाठी मुन्सिपल हायस्कूलयेथील सन १९९२-९३ च्या दहावीतील माजी विद्यार्थी एकत्र येऊन ३० वर्षांनी अनेक आठवणीना उजाळा देत पुन्हा एकदा आठवणींची शाळा भरविण्यात आली. या आगळ्यावेगळ्या स्नेहमेळाव्याचे आयोजन माजी विद्यार्थ्यातर्फे करण्यात आले होते. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक सर्व माजी विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी यानी देखील मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली तसेच दिवंगत व्यक्तीना श्रद्धांजली वाहण्यात आली. शिक्षकांचा सत्कार माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. मित्र-मैत्रिणीनी शालेय जीवनातील आठवणीना उजाळा दिला. माजी विद्यार्थ्यांपैकी अनेकजण शिक्षक, सरकारी कर्मचारी यशस्वी उद्योजक, उद्योजिका, समाजसेविका प्रगतशील शेतकरी तसेच विविध क्षेत्रात अनेक पदावर यशस्वीपणे कार्यरत आहेत.
यावेळी यावेळी माजी विद्यार्थी संतोष मेस्त्री, सदाशिव बुदिहाळे, संतोष सांगावकर, विकास वासुदेव यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी या शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहून शालेय मुलांना गणवेश, शैक्षणिक साहित्य व शिक्षणाविषयी इतर गोष्टीसाठी मदत करत राहणार आहे. तसेच शाळेत जास्तीजास्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगीतले. शिक्षकांनी स्नेहमेळावा म्हणजे एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा महत्वपूर्ण उपक्रम आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाज उपयोगी उपक्रमांना प्राधान्य द्यावे. तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करावी प्रत्येकाने सामाजिक विकासासाठी कार्यरत रहावे, असे आवाहन केले. यावेळी रवींद्र चौगुले, जलील हलगले, नगरसेवक संतोष सांगावकर, पिंटू यादव, सदाशिव बुदिहाळे, अरुण पाटील, विशाल अब्दागिरे, संजना शिंदे, आशा हलगले, एस. एम. भिसे, आर. एम. चव्हाण, एस. ए. काळे, एस. आर. कांबळे, के. आर. कमते, एस. आर. हवालदार, एस.टी. परीट, ए. एम. पाटील, ए.एस. सुतार, आर. व्ही. शिंत्रे यांच्यासह माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta