
निपाणी (वार्ता) : येथे कोरवी गल्ली येथे श्रीमंत सिद्धोजी राजे निपाणकर -सरकार यांनी कोरवी समाजाला दिलेल्या जागेमध्ये समाजाने स्वखर्चाने समुदाय भावनाची निर्मिती केली आहे. त्याचे उद्घाटन श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर -सरकार यांच्या हस्ते करण्यात आले.
समुदाय भावनाच्या उद्घाटन प्रसंगी कोरवी समाजातील महिला पाण्याच्या घागऱ्यांची सवाद्य मिरवणूक काढून भावनांमध्ये श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले. या ठिकाणी दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमासह पीर बसवण्याचा कार्यक्रम शेकडो वर्षापासून केला जात आहे. या जागेवर समाजाने स्वखर्चाने भवन उभारून समाजातील कार्यक्रमांना उपयुक्त ठरणार असल्याचे दादाराजे यांनी सांगितले.
यावेळी अशोक कोरवी, श्रीकांत कोरवी, राजू कोरवी, चंद्रकांत कोरवी, श्रीकांत कोरवी, सदाशिव कोरवी, महादेव कोरवी, दीपक कोरवी, आप्पासाहेब कोरवी, बाबुराव कोरवी, राजेंद्र कोरवी, विनय कोरवी, ओमकार कोरवी, मारुती कोरवी, अक्षय कोरवी, गणेश कोरली, राहुल कोरवी, कमल कोरवी, रत्नाबाई कोरवी, गौराबाई कोरवी, हिराबाई कोरलीइ, जयश्री कोरवी, संगीता कोरवी यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. कोरवी समाजाचे तालुका उपाध्यक्ष अशोक कोरवी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta