निपाणी (वार्ता) : येथील अशोक नगरमध्ये बेल्लद बागेवाडी येथील बेल्लद बागेवाडी अर्बन सौहार्द संस्थेच्या निपाणी शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. आडी येथील मठाचे शिवानंद स्वामु व आडी दत्त मंदिर मठाचे परमात्माराज महाराजांच्या प्रमुख उपस्थितीतहा कार्यक्रम पार पडला.
बँकेचे अध्यक्ष पवन कत्ती म्हणाले, १९४४ मध्ये स्थापन झालेली या बँकेची ही १९ वी शाखा आहे. आणखी कांही दिवसांत नवीन ८ शाखा सुरू होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून परवानगी मिळालेल्या आमच्या बँकेने मार्च २०२३ पर्यंत ३९२ कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या आहेत. २१७ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. खेळते भांडवल ४३८ कोटी असून चालू आर्थिक वर्षात २.२८ कोटी रुपयाचा निव्वळ नफा झाल्याचे त्यांनी सांगीतले.
यावेळी ऍड. संजय शिंत्रे यांनी, ‘बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांच्या मार्गदर्शनाखाली चालवली जाणारी ही बँक ग्राहकांसाठी सर्व प्रकारच्या कर्जासाठी अत्यंत कमी व्याजदर आकारते. याचा लाभ निपाणी परिसरातील नागरीकांनी घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, उपाध्यक्ष मलगोंडा पाटील, संचालक पप्पू पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, उद्योजक अभिनंदन पाटील, पंकज पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, नगरसेवक संजय पावले, माजी नगरसेवक दिलीप पठाडे, सिद्धप्पा हगरगी, राजाराम शिराळकर, विनायक बुर्जी, मकबूल अम्मनगी, संजय पावणे, राजकुमार पवार, डॉ. मलगोंडा पाटील, गणी पटेल, गोपाळ नाईक, विनायक ढोले, सुनिला पाटील, सुदीप उगळे, प्रशांत गुंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुख्य व्यवस्थापक सुनिला बेल्लद यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta