निपाणी (वार्ता) : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील दहावी परीक्षेत येथील बीएसएम बॉईज हायस्कूल मधील विद्यार्थी साईराज ज्योतिबा पाटील याला ९८.७२ टक्के गुण मिळाले होते. तरीही त्याच्यासह कुटुंबीयांनी उत्तर पत्रिकांचे फेर मूल्यांकन करण्याची मागणी केली. त्यानुसार हेअर मूल्यांकन होऊन त्याला ९९.०४ टक्के गुण मिळाल्याने कर्नाटक राज्यात मराठी विभागात त्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
साईराज पाटील याला ९८.७२ टक्के गुण मिळाले होते. पण हे गुण कमी पडल्याचे साईराजने कुटुंबीयांना सांगितले. त्यानुसार कुटुंबीयांनी उत्तर पत्रिकेच्या छायाचित्र प्रति मागवून घेतल्या. याप्रती शिक्षण क्षेत्रातील तज्ञांना दाखवून शहानिशा करून घेतली. त्यावेळी संबंधित शिक्षण तज्ञांनी गुण कमी पडल्याचे सांगितले. त्यानुसार साईराजच्या उत्तर पत्रिकांचे फेरमूल्यांकन करण्याची मागणी संबंधित विभागाकडे केली. त्याचे फार मूल्यांकन झाल्यानंतर त्याला ९९.०४ टक्के गुण मिळाले. त्यामुळे कर्नाटक राज्यामध्ये मराठी विभागात त्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
साईराज हा पहिलीपासून हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. नववी पर्यंत त्याने प्रथम क्रमांक पटकावला होता. याशिवाय प्रज्ञाशोध स्पर्धा, एनसीसी कमांडर सर्जंट मध्येही त्यांने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. याशिवाय सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये राज्य व आंतरराज्य पातळीवर त्यांने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याला वडील जोतिबा पाटील तर आई डॉ. स्नेहल पाटील या शिक्षक दांपत्यासह शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta