माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी; पदाधिकाऱ्यांची चिंतन बैठक
निपाणी (वार्ता) : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्ष जनता करा तर्फे सर्वच ठिकाणी उमेदवार उभे केले होते. पण काही त्रुटीमुळे या निवडणुकीत आपल्याला हवे असलेले उमेदवार निवडून येऊ शकले नाहीत. तरीही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराज न होता यापुढील काळात होणाऱ्या तालुका आणि जिल्हा पंचायतीच्या निवडणुका सर्व ताकदीनिशी लढण्याची तयारी असल्याचे मत माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी व्यक्त केले. बंगळुर येथील निधर्मी जनता दलाच्या कार्यालयात आयोजित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, यापूर्वी आपण शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना राबविले आहेत. यंदाच्या निवडणुकीत आपल्याला यश मिळण्याची आशा होती. पण तसे न होता काही उमेदवार निवडून आले आहेत. तरीही आपण शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी कायम आहोत. सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तालुका आणि जिल्हा पातळीवर पदाधिकारी कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने कामाला लागल्याचे आवाहन त्यांनी केले.
चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी, कर्नाटकामध्ये यापूर्वी धर्मनिरपेक्ष जनता दलाची सत्ता असताना शेतकऱ्यांचे कर्ज माफ, रस्ते वीज आरोग्य अशा विविध योजना राबविले आहेत. त्याच जोरावर यंदाची निवडणूक लढवली होती. पण धर्मनिरपेक्ष जनता दलाला यशापासून दूर राहावे लागले आहे. तरी कार्यकर्त्यांनी खचून न जाता संघटन करणे आवश्यक आहे. त्यासाठी तालुका आणि जिल्हा पातळीवर बैठका घेतल्या जाणार आहेत.
त्यावेळी झालेल्या चिंतन बैठकीस धर्मनिरपेक्ष जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, शिवानंद मोगलीहाळ, बेळगाव जिल्हा धजद अध्यक्ष शंकर मडलगी, चिक्कोडी जिल्हा धर्मनिरपेक्ष जनता दलाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा मग्गेगन्नावर, सिद्धया स्वामी, बंडाप्पा काशपनावर, अश्विनी पुजारी, सिध्दया पुजारी, सिद्धगोंडा पाटील, मयूर पोवार, रोहन पाटील, सर्जेराव हेगडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta