मानसशास्त्रीय सल्लागार नवश्री; जी आय. बागेवाडी महाविद्यालयात कार्यशाळा
निपाणी (वार्ता) : सध्याच्या आधुनिक जगात, कधीकधी विचार तीव्र होऊन त्याचे गंभीर परिणाम होतात. त्यामुळे मानसिक उदासीनता निर्माण होते. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मानस शास्त्रज्ञांसोबत योग्य समुपदेशन व्हायला हवे, असे मत धारवाड विद्यापोषक संस्थेच्या मानसशास्त्रीय सल्लागार नवश्री यांनी व्यक्त केले.
केली के एल ई संस्थेचे स्थानिक बागेवाडी महाविद्यालयाचा प्लेसमेंट सेल आणि धारवाड इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्टेज ऑफ ग्रोथ अँड सायकॉलॉजिकल कौन्सिलिंग’ या विषयावर आयोजित एकदिवसीय कर्मचारी विकास कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, सल्लामसलत करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्यानुसार मानसिक त्रास कमी होतो. प्रत्येकानी आपल्या आचार विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे. त्यामुळे मानसिक संतुलन योग्य राहून कामातील उत्साह वाढत असल्याचे सांगितले.
केएलई संस्थेचे संचालक प्रवीण बागेवाडी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी तर प्रमुख पाहुण्या म्हणून धारवाड संस्थेच्या मानसशास्त्रज्ञ श्रीदेवी बिरादर या उपस्थित होत्या. समन्वयक डॉ. अतुलकुमार कांबळे यांनी स्वागत केले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. आर. जी.
खराबे, प्राचार्या हेमा चिक्कमठ यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. शंकरमूर्ती के. एन. यांनी सूत्रसंचालन केले. श्रीदेवी मुंडे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta