प्रा.सुरेश कांबळे; नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत
निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील सद्यस्थितीत विचार करता पाहण्यासाठी होणारी हेळसांड पाहता अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. लोकप्रतिनिधींची दूरदृष्टी व राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे अशा प्रकारची गंभीर व भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे आशा भीषण परिस्थितीमध्ये स्वतःला सर्वच राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी समजणारे प्रत्येक जण आपली बेजबाबदारी दुर्लक्ष वृत्ती जोपासलेली आहे. निपाणी शहरातील अनेक नागरिकांना सात ते आठ दिवसातून मिळणारे पाणी मिळत असल्यामुळे अशा भीषण परिस्थितीमध्ये सुद्धा निपाणी करांची तहान भागवण्यासाठी कोणीही पुढे येत असताना दिसत नाही. हे शहरवासीयांचे दुर्दैव आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रत्येक लोकप्रतिनिधींनी अतिशय गंभीर असलेल्या पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी आपापल्या पक्षाच्या प्रचारासाठी दंग राहिला. व्यक्तिगत स्वार्थाच्या भावनेतून भविष्यातून निर्माण होणाऱ्या निपाणी करांच्या पाण्याचा तीळ मात्र विचार कोणीही केलेला दिसून आला नाही. निपाणी नगरपालिका यासंदर्भात निष्क्रिय स्थितीमध्ये असताना या व्यवस्थित पाणीपुरवठाकडे लक्ष नाही. खऱ्या अर्थाने निपाणी शहरवासीयांना अशा लोकप्रतिनिधींच्या चुकांमुळे भीषण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक जण आपली जबाबदारी नाही अशा आविर्भावात असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी वेळेत जागृत होऊन निपाणीकरांच्या पाण्याची भीषण अवस्था नाहीशी करणे प्रत्येक लोकप्रतिनिधींचे काम आहे. जर अशा प्रकारचे दुर्लक्ष केल्यास निपाणी करांच्या सहनशीलतेचा अंत होईल. त्यामुळे कोणत्याही लोकप्रतिनिधीला आपले स्थान पुन्हा राखता येणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुरेश कांबळे यांनी दिला आहे. अजूनही या सर्व भीषण परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून सर्वपक्षीय नेते मंडळींनी एकत्र येऊन येणाऱ्या काळामध्ये पाण्याचे नियोजन करून निपाणीकरांची तहान भागवावी असे आवाहन, प्रा.सुरेश कांबळे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta